Home > News Update > आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार?

आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार?

आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार?
X

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेच्या १५० जागा लढवण्याचा ठरवलं आहे. त्यातली पहिली यादी आज जाहीर केली आहे. पण सर्वांना उत्सुकता आहे ती वरळी मतदार संघात राज ठाकरे आपला उमेदवार देणार का?

वरळी मतदार संघातून शिवसेनेकडून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असून शिवसेनेने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस ने उमेदवार देऊ नये यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भेट घेतली होती.

सुप्रिया सुळे यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंबीयांशी असलेले सबंध पाहता हा निर्णय घेण्यात आला होता. आता आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांचे पुतणे असल्याने ते वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

Updated : 1 Oct 2019 4:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top