Home > News Update > ‘हे’ आहेत मंत्रीमंडळाच्या बैठकीतील ५ महत्वाचे निर्णय

‘हे’ आहेत मंत्रीमंडळाच्या बैठकीतील ५ महत्वाचे निर्णय

‘हे’ आहेत मंत्रीमंडळाच्या बैठकीतील ५ महत्वाचे निर्णय
X

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत समृद्धी महामार्गाला भागभांडवल म्हणून 3 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

काय मंत्री मंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय?

  1. राज्यातील दुय्यम न्यायालयातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता.

    2. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.

    3. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय.

    4. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी.

    5. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता अधिकार. अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यास मान्यता.

Updated : 11 Dec 2019 3:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top