Home > News Update > ‘नाइट लाइफ’ संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा नाही – अनिल देशमुख

‘नाइट लाइफ’ संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा नाही – अनिल देशमुख

‘नाइट लाइफ’ संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा नाही – अनिल देशमुख
X

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत ‘नाइट लाइफ’ बाबत विचार सुरु असल्याचं स्पष्ट केलं होतं. नोकरी करणाऱ्या नागरिकांना रात्री उशीरा घरी यावं लागतं त्यामुळे त्यांना सोईचे व्हावे म्हणून रात्री हॉटेल्स, मॉल, दुकाने सुरु ठेवणं गरजेचे आहे.

येत्या प्रजासत्ताक दिनापासून मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरु केलं जाईल असं आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. मात्र, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या पोलीस बंदोबस्तची तयारी केलेली नाही. त्यामुळे २६ जानेवारीपासून ‘नाइट लाइफ’ सुरु होणं अशक्य असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ‘नाइट लाइफ’ सुरु करण्याबाबत अजूनही पोलीसांची तयारी चालू आहे. राज्य मंत्रिमंडळात त्यावर चर्चा झालेली नाही. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्दयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. असंही अनिल देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Updated : 20 Jan 2020 6:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top