Home > News Update > CAB : तर पूर्ण भारतात डिटेंशन सेंटर तयार होतील, कॉग्रेस नेते आनंद शर्मा यांचा अमित शाह यांना सवाल

CAB : तर पूर्ण भारतात डिटेंशन सेंटर तयार होतील, कॉग्रेस नेते आनंद शर्मा यांचा अमित शाह यांना सवाल

CAB : तर पूर्ण भारतात डिटेंशन सेंटर तयार होतील, कॉग्रेस नेते आनंद शर्मा यांचा अमित शाह यांना सवाल
X

दुसऱ्या देशातील व्यक्तीला भारताचं नागरिकत्व देण्यासाठी असणाऱ्या कायद्यात बदल करण्याच्या विधेयकाला लोकसभेनं मंजूरी दिली आहे. त्यानंतर आज हे सुधारणा विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत मांडलं. राज्यसभेत सत्ताधारी भाजपचं बहुमत नाही. त्यामुळं राज्यसभेत भाजप सरकारची कसोटी लागणार आहे.

हे विधेयक मांडताना अमित शाह यांनी सर्व विरोधकांना या चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. या विधेयकामुळे धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल असं म्हणत हे विधेयक मांडलं.

त्यानंतर सभागृहात या विधेयका संदर्भात बोलण्यासाठी उभं राहिलेल्या कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी अमित शहा यांच्या सर्व वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

हे ही वाचा

गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

गांधीजी आम्हाला माफ करा – हेमंत देसाई

अमित शहांवर निर्बंध घालण्याची मागणी

दोन देशाची निमिर्ती ची थेअरी सावरकरांनी 1937 ला मांडली होती. ( two nations theory) हिन्दू महासभेच्या बैठकीत टू नेशस थ्येरीचा उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू महासभा ने मुस्लीम लीग च्या टू नेशन थेअरी चं समर्थन केलं होतं. भाजपनं दुसऱ्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करु नये. वेळ सांगेल इतिहास कशा पद्धतीने विधेयकाकडे पाहतो. असं म्हणत कॉग्रेस ने या देशाचं विभाजन केलं या वक्तव्याचा आनंद शर्मा यांन चांगलाच समाचार घेतला.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने देशात असुरक्षतेची भावना आहे. लोकांच्या मनात शंका आहे. जर असं असेल तर पूर्ण भारतात डिटेंशन सेंटर तयार होतील. असं म्हणत भाजप वर हल्ला बोल केला.

Updated : 11 Dec 2019 8:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top