Home > News Update > 'GST' ची नवीन सुधारित आवृत्ती एप्रिलपासून

'GST' ची नवीन सुधारित आवृत्ती एप्रिलपासून

GST  ची नवीन सुधारित आवृत्ती एप्रिलपासून
X

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत वस्तू आणि सेवा कराची (GST) सुधारित आवृत्ती एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा केली. जी.एस.टी मूळे अंदाजे १ लाख कोटी रु वाचले असा दावा देखील आपल्या भाषणादरम्यान अर्थमंत्रि निर्मला सितारमण यांनी केला. त्याचप्रमाणे नवी सुधारीत आवृत्ती ही अतीशय सुधारित आणि सुटसुटीत असेल असं यावेळी त्यांनी सांगीतले.

मागील दोन वर्षातील अर्थव्यवस्थेमध्ये GST ला अनेक अडचणींना सामोरे जावं लागले. तसंच GST मधील अडथळे दूर करण्याचे कामही चालू आहे. यासाठी योग्य त्या उपाय-योजना करण्यासाठी GST परिषदेने काम असून देशात लागू केलेल्या GST मूळे नवीन १६ लाख करदाते मिळाले आहेत. त्याचप्रमाणे याचा ग्राहकांना देखील मोठा फायदा झाल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

Updated : 1 Feb 2020 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top