Top
Home > Max Political > प्रजासत्ताक दिनाचा वादग्रस्त पाहुणा- जैर बोल्सोनारो

प्रजासत्ताक दिनाचा वादग्रस्त पाहुणा- जैर बोल्सोनारो

प्रजासत्ताक दिनाचा वादग्रस्त पाहुणा- जैर बोल्सोनारो
X

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत ते दिल्लीत दाखल झालेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे ते प्रमुख पाहुणे आहेत. बोल्सोनारो हे उजव्या विचारसणीचे व्यक्ती आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी बोल्सोनारो यांना डोनाल्ड ट्रम्प यांचा सख्खा भाऊ म्हणूण ओळखलं जातं. महिला, लोकशाही, वंशवाद या विषयावर त्यांची मते अतिशय बुरसटलेली आहेत. बोल्सानारो यांची विविध विषयावरील किती जहाल मत व्यक्त केली आहे. त्याचा हा घेतलेला आढावा

महिला

मारीया रोसारीओ या महिला लोकप्रतिनिधीने महिलांवर बलात्कार करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप बोल्सोनारो यांच्यावर केला. त्याला उत्तर देतांना बोल्सोनारो काय म्हणतात

"मी तुमच्यावर बलात्कार करणार नाही, कारण तुमची ती पात्रता नाही"

हे विधान मागे घ्यायला बोल्सनारो यांनी नकार दिला. या विधानासाठी बोल्सनारो यांच्यावर खटला भरण्यात आलाय.

२०१६ मध्ये एका मुलाखतीत बोल्सोनारो यांचा महिलांबद्दलचा आकस समोर आला.ते म्हणाले

‘मी पुरुषांएवढा पगार देवून बायकांना कामावर ठेवणार नाही. कारण त्या गर्भवती राहतात’

पत्नी

बोल्सानारो यांनी पहिल्या बायकोला घटस्फोट दिला. बोल्सोनारो यांनी पहिल्या बायकोबद्दल खूप वाईट शब्द काढले.

‘माझ्या बायकोला मी कधीच मारहाण केली नव्हती. मात्र तिला गोळ्या घालण्याचा विचार माझ्या मनात अनेकदा आला’

बोल्सोनारो यांना चार मुल आणि एक मुलगी आहे. एकुलत्या एक मुलीबद्दलचं त्यांच विधान ऐका

‘मला पाच अपत्य आहेत, त्यापैकी चार मुलं आहेत, पाचव्या वेळी मी जरा दुबळा झालो होतो म्हणून मुलगी झाली”

वंशवाद

वंशवादाबद्दलही बोल्सोनारो यांची टोकाची मतं आहेत. पोर्तुगीज लोकांनी आफ्रिकेत कधी पाऊल ठेवलं नाही. मात्र कृष्णवर्णीय लोकच गुलामांचा व्यवसाय करत होते असही त्यांच मत आहे.

‘मी कधी कृष्णवर्णीयांना गुलाम म्हणून ठेवलं नाही. त्यामुळे मी त्यांची पर्वा का बाळगू’.

बोल्सोनारो यांना एकदा विचारण्यात आलं की तुमचा मुलगा कृष्णवर्णीय मुलीच्या प्रेमात पडला तर तुमची प्रतिक्रीया काय असेल

‘माझी मुलं उच्चशिक्षीत आहे. त्यामुळे असली जोखीम ते पत्करतील असं वाटत नाही’

समलिंगी संबध

डिसेंबर २०११ बोल्सोनारो यांनी ‘प्ले ब़ॉय’ या मॅगझीनला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांना विचारलं गेलं जर तुमचा मुलगा समलिंगी निघाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल

‘बाप म्हणून मी समलिंगी मुलाला कधीच स्वीकारु शकत नाही. गे परेडमध्ये भाग घेण्यापेक्षा तो अपघातात मेला तर मला आनंद होईल.’

२००२ मध्ये तत्कालीन ब्राझीलचे राष्ट्रपती फर्नांडो कार्दोस यांनी समलिंगी विवाहाचा पुरस्कार केला होता. त्यावेळी बोल्सोनारो म्हणाले,

'समलिंगी संबंधाला मला विरोध करायचा नाही. मात्र रस्त्यावर दोन पुरुष चुंबन घेतांना दिसले तर मी सरळ त्यांना मारहाण करेल.'

लोकशाही

तुमच्या मताने लोकशाहीत काहीच बदल होवू शकत नाही असा ठाम विश्वास बोल्सोनारो यांनी नेहमीचं व्यक्त केला. देशात खरोखर बदल घडवायचे असेल तर ब्राझीलमध्ये गृहयुध्द सुरु करा आणि लष्करी राजवटीने जे केलं नाही ते कामं करावं लागेल. हजारो नागरिकांना ठार मारावं लागेल. सध्याच्या राष्ट्रपतींना ठार करुन चांगली सुरुवात करावी लागेल असही ते म्हणाले होते.

युध्दात काही निर्दोष मारले जातील. मात्र प्रत्येक युध्दात निर्दोष नागरिकांचा हकनाक बळी जातोच. मी मेलो तरी चालेल मात्र माझ्यासोबत ३० हजार लोक मेले पाहिजेत – बोल्सोनारो

मानवाधिकार

मानवाधिकार हा फार्स आहे असचं बोल्सोनारो यांच मत आहे. त्यामुळे पापाची शिक्षा भोगण्यासाठी ब्राझीलचे तुरुंग ही एक चांगली जागा आहे. ज्यांनी गुन्हे केले त्यांचा छळ केलाच पाहिजे,अस ते कायम म्हणतं असतात.

लोकांना सरळ करण्यासाठी त्यांचा छळ केला पाहिजे. अंमली पदार्थ विकणाऱ्या लोकांचा छळ केलाच पाहीजे. त्यांना विजेच्या खांबावर लटकवलं पाहिजे.

स्थलांतर

दुसऱ्या देशातून विशेषता आफ्रीकन देशातून ब्राझीलमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांचा बोल्सोनारो यांना तिरस्कार आहे.

‘जगातील घाण ब्राझीलमध्ये आली आहे. ब्राझीलच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत.’

अमेझॉनची आग

अमेझॉनच्या आगीमुळे काहीही नुकसान न झाल्याचा दावा बोल्सोनारो यांनी केला. या आगीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या फ्रांसच्या अध्यक्षांवरही त्यांनी टिका केली होती.

ब्राझीलची बदनामी करण्यासाठी आग लावली आहे. मी सामाजिक संस्थांचं अनुदान बंद केलं त्यामुळे त्यांनी ही आग लावली आहे.

Updated : 24 Jan 2020 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top