प्रेयसीच्या घरात प्रियकराला मारहाण, प्रियकराचा मृत्यू

1262
Courtesy : Social Media

प्रेयसीच्या घरात रात्रीच्या वेळेस प्रियकर आढळून आल्यानं प्रेयसीच्या नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात ही घटान घडली आहे. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी ८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर देवेन्द्र घिवे वय ३२ याचे लग्न झाले असून त्याचे घरासमोरच राहणाऱ्या एका युवतीसोबत मागील दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. सदर युवतीचे लग्न ७ फेब्रुवारी २०२० रोजी होणार होते. दरम्यान ४ फेब्रुवारी च्या रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान ज्ञानेश्वर घिवे हा युवक प्रेयसीच्या घरात लपून बसलेल्या स्थितीत आढळून आला.

प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. ही बाब ज्ञानेश्वर चे वडील देवेंद्र घिवे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमुद केली आहे. त्यामुळे दिलेल्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी प्रेयसीच्या ८ नातेवाइकांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलिस करीत आहेत.