महाराष्ट्रातून आतापर्यंत किती कामगार आपापल्या राज्यात परतले?

Migrant workers

लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोट्यवधी मजूर आणि कामगारांना याचा मोठा फटका बसला. हाताला काम नसल्याने जगायचे कसे असा प्रश्न या कामगारांपुढे निर्माण झाल्याने अनेकांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्र सरकारने या लोकांसाठी विशेष श्रमिक ट्रेनची घोषणा केली.

हे ही वाचा…


कोरोनावरील लसीचे २० लाख डोस तयार : ट्रम्प

जिकडे तिकडे आनंद गडे!

लॉकडाऊन नंतरचे ऑनलाइन शालेय शिक्षण

त्यानुसार महाराष्ट्रातून आतापर्यंत ८२६ श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर या ट्रेनमधून आतापर्यंत ११ लाख ९० हजार ९९० परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात परतले आहेत. तर त्यांच्या तिकीटांसाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे.