धक्कादायक! मजुरांना घेऊन जाणारा कंटेनर वर्ध्यात उलटला!

856

भिवंडी येथून 33 मजुरांना घेऊन जाणारा कंटेनर वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील ठाणेगाव जवळ अपघात झाल्याची घटना आज (१३ मे) सकाळी घडली आहे. यामध्ये ४ कामगार गंभीर जखमी झाले आहे. तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्धा येथे उपचार करण्यात आले आहे.

चालकाला डुलकी आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दुभाजकावर धडकून उलटले. यामध्ये असलेले प्रवासी किरकोळ जखमी झाले. तसेच चौघे गंभीर जखमी झाले. भिवंडी येथून ३३ मजुरांना घेऊन कंटेनर अलाहाबादला जात असताना राष्ट्रीय महामार्ग सहावर सकाळी हा अपघात झाला. हे सर्व मजूर भिवंडी या रेड झोनमधून आले असल्याने त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे होते.

त्यामुळे खबरदारी म्हणून डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. इंदुलकर आणि डॉ. खुजे डॉक्टरांनी “पीपीई किट” घालून त्यांच्यावर उपचार केले. जखमींपैकी एकाच्या डोकं, हात आणि छातीला दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोरोनाचा परिस्थिती आम्हाला होणारा त्रास महत्त्वाचा नसून रुग्ण सेवा अधिक महत्वाची आहे. सुरक्षेसाठी पीपीई किट घालून उपचार करताना नक्कीच त्रास सहन करावा लागत असला, तरी तो या काळात रुग्णसेवेपुढे गौण असल्याची भावना डॉ. अनुपम हिवलेकर यांनी बोलून दाखवली आहे.