परदेशातून परतणाऱ्यांसाठी मुंबईत ३ हजार रुम्स

Courtesy: Social Media

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यात येत आहे. याअंतर्गत मुंबईत परतणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरूवातीला अलगीकरण (quarantine) केले जाणार आहे.

त्यासाठी महानगरपालिकेने एकूण ८८ हॉटेलमध्ये मिळून ३,३४३ रुम आरक्षित केल्या आहेत. परदेशात अडकलेल्या नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्यात १२ देशांमधून ६४ विमान फेऱ्यांमधून एकूण १४ हजार ८०० प्रवासी भारतात येणार आहेत. यापैकी मुंबईमध्ये एकूण सात विमानातून सुमारे १,९०० नागरिक येतील. बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत परतणार आहेत.

हे ही वाचा…मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार, अखेर महापालिकेनं घेतली गंभीर दखल

धक्कादायक! मुंबई सायन हॉस्पिटल मध्ये मृतदेह ठेवायला जागा नाही, शव गृहाची क्षमता संपली

कोरोना व्हायरस: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलावली सर्वपक्षीय बैठक, देवेंद्र फडणवीस उपस्थित

सर्वपक्षीय बैठक: कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार का?

परतलेल्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर कोरोनाची बाधा झालेली आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. तर अलगीकरण करण्यासाठी मुंबईतील विविध ८८ हॉटेलमध्ये एकूण ३,३४३ रुम आरक्षित करण्यात आल्या आहेत.