Home > News Update > बीजेपीच्या मार्गाने प्रश्न सुटू शकत नाही-एकमेव कश्मीरी पंडीत खासदार विवेक तंखा

बीजेपीच्या मार्गाने प्रश्न सुटू शकत नाही-एकमेव कश्मीरी पंडीत खासदार विवेक तंखा

बीजेपीच्या मार्गाने प्रश्न सुटू शकत नाही-एकमेव कश्मीरी पंडीत खासदार विवेक तंखा
X

बीजेपीच्या मार्गाने प्रश्न सुटू शकत नाही. असं मत एकमेव कश्मीरी पंडीत खासदार विवेक तंखा यांनी राज्यसभेत बोलताना व्यक्त केले आहे. गुलाम नबी आझाद यांनी ऐतिहासिक दृष्टीने मांडणी केली, इतरांनी घटनात्मक बाबी सांगीतल्या, मी माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून बोलत आहे. ज्याला ऐतिहासिक दृष्टीकोनही आहे. मी कश्मीरी पंडीत आहे. कदाचित राज्यसभेतील एकमेव कश्मीरी पंडीत असेन मी. गेल्या 100 वर्षांत आपण पाहिलंय की कशा पद्धतीने कश्मीरी पंडितांनी कश्मीरच्या बाहेर स्थलांतर केलं आहे. 1990 नंतर याचं प्रमाण वाढलं.

काल संपूर्ण रात्रभर कश्मीरी पंडीत झोपले नाहीत. त्यांना माहित होतं काय होणार आहे. संपूर्ण जगभरातून फोन येत होते. समस्या, मला जी दिसतेय ती अशी आहे की आपण ही समस्या बीजेपी च्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करतोय. बीजेपी चा मार्ग म्हणजे तो मार्ग आहे ज्यात यातल्या स्टेकहोल्डर्स ना विश्वासात न घेता प्रश्न सोडवला जातो. मी ऍडवोकेट जनरल म्हणून काम पाहिलंय. राज्यांचं विभाजन कशा पद्धतीने केलं जातं हे मला माहित आहे. राज्य आपला ठराव करतात आणि संसदेला पाठवतात, संसद प्रस्ताव पारित करून राज्याला पाठवते. मी मध्यप्रदेशात हे पाहिलंय. त्यानंतर संपूर्ण प्रक्रीया राबवली.

तुम्ही आता केंद्रशासित प्रदेश बनवला पण हे सर्व कश्मीरी पंडीत खरंच परत जातील का, ते जाऊ शकतील का, त्यांच्याशी काही चर्चा झालीय. हे शक्य आहे का. सर्वांना शंका वाटतेय की ते परत जाऊ शकतील का.. तिथली विधानसभा अस्तित्वात असती आणि तिथे यावर चर्चा झाली असती, त्यांच्या संमतीने झालं असतं तर जे लोक बाहेर आहेत ते परत जाऊ शकले असते.

https://youtu.be/huP1h6HZYvQ

Updated : 5 Aug 2019 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top