Home > News Update > CAA विरोधात प्रस्ताव पारित केल्यामुळे भाजपने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष केले निलंबीत

CAA विरोधात प्रस्ताव पारित केल्यामुळे भाजपने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष केले निलंबीत

CAA विरोधात प्रस्ताव पारित केल्यामुळे भाजपने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष केले निलंबीत
X

४ दिवसांपूर्वी भाजपची सत्ता असणाऱ्या सेलू नगरपरिषदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात (CAA) सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) ठराव मंजूर केला होता. याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि पालम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

देशात एकीकडे सीएए आणि एनआरसीवरुन वातावरण तापलेले असताना भाजपच्या ताब्यात असलेल्या परभणीच्या सेलू नगरपालिकेने या कायद्याच्या विरोधात ठराव घेत तो पारित केला होता. त्यामुळे या निर्णयाची चर्चा राज्यभर झाली. २८ पैकी २६ नगरसेवकांनी या ठरवावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

परभणीच्या सेलू नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा २८ फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यात भाजपचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ (सीएए), आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीला (एनपीआर) विरोध असल्याचा विषय मांडला. ज्यावर सर्व सदस्यांनी चर्चा केली आणि शेवटी नगरसेवक अब्दुल वहिद हमीद यांनी अनुमोदन दिले. सभागृहात उपस्थित असलेल्या २८ पैकी २६ नगरसेवकांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

केवळ शिवसेनेचे नगरसेवक मनीष कदम आणि आशा दिशागत यांनी पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठींना विचारुन मग आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगून स्वाक्षऱ्या केल्या नव्हत्या. महत्त्वाचे म्हणजे हा ठराव घेतल्याचे अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्याविरोधात जाऊन CAA विरोधात नगरपरिषदेमध्ये ठराव केल्यामुळे बाळासाहेब गणेश रोकडे आणि विनोद हरीभाऊ बोराडे या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे असं भाजपकडून सांगण्यात आलंय.

Updated : 4 March 2020 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top