Home > News Update > भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं शिवसेनेचा गंभीर आरोप

भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं शिवसेनेचा गंभीर आरोप

भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं शिवसेनेचा गंभीर आरोप
X

“ईडी, सीबीआयच्या मदतीनं ज्यानी सरकारं बनवली. ते त्यांच्यावरच उलटलं आहे. सध्या तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले असून, याच गुंडागर्दीचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे. त्यांची नावं लवकच जाहीर करू, पण भाजपाचं(BJP) राजकारण गुंडाच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं झालं आहे. हे महाराष्ट्रात चालणार नाही,” असा गंभीर आरोप शिवसेनेचे (shivsena)नेते संजय राऊत (sanjay raut)यांनी भाजपवर केला आहे.

राज्यात विधानसभेचा निकाल लागून 10 ते 12 दिवस झाले आहेत. मात्र, अजुनही राज्यात कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. किंबहुना राज्यपालांनी कोणत्याही पक्षाला आमंत्रण दिलेले नाही. राज्यातील जनतेने शिवसेना भाजप युतीला कौल दिलेला आहे. मात्र, शिवसेना मुख्यमंत्री (CMO)पदासाठी आडून बसलेली आहे. शिवसेनेला सत्तेत समसमान वाटा हवा आहे. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जायला तयार नाही.

काय म्हटलंय राऊत यांनी?

“ईडी, सीबीआयच्या मदतीनं ज्यांनी सरकार बनवलं. ते त्यांच्यावरच उलटलं आहे. तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले आहेत. गुंडागर्दीचा वापर करून दबाव आणला जात आहेत. अशाप्रकारचं घाणेरडं राजकारण चालणार नाही. कर्नाटकातील येडीयुरप्पा फॉर्म्युला महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं झालं आहे. सत्ता गेल्यानंतर आसपासची माकडं आणि कुत्रेही जवळ राहत नाही. गृहमंत्रालय आणि पोलिसांच्या बळावर राज्य करता येत नाही.

असं म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालानं राज्यातील राजकीय पक्षाची चांगलीच गोची झाली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेचं घोडं अजुनही गंगेत न्हालेलं नाही. त्यामुळं शिवसेना कॉंग्रेस (Congrss) राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सरकार स्थापन करेल का? या चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे. त्यातच शिवसेना आमच्यासमोर इतरही पर्याय आहेत, असं म्हणत भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

Updated : 3 Nov 2019 9:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top