ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा: नारायण राणे

Uddhav govt has failed to take firm decisions, instil confidence in people Narayan Rane

सध्या महाराष्ट्रातील राज्याचं सत्ताकेंद्र राजभवन झालं की काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आज सकाळीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर आज 5 वाजता भाजप चे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली.

“ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी”

अशी मागणी नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.