राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या भूमिपुत्रांसाठी विशेष बस सोडा- प्रवीण दरेकर

लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर राज्यात परप्रांतीय मंजूर किंवा कामगार मोठ्या प्रमाणात अडकून पडले आहेत. पण त्याचबरोबर राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून दुसरीकडे विविध कारणांसाठी आलेल्या आणि सध्या ठिकठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना घऱी जाण्यासाठी राज्य सरकारने विशेष बसेसची सोय करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

“विविध राज्यांमधील परप्रांतिय मजूरांना आपल्या गावी पाठवण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मागणी योग्य आहे. आमचा त्या मागणीला पाठिंबा आहे. पण कोरोनाच्या या संकटात जो महाराष्ट्रांतर्गत भूमिपूत्र जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये अडकला आहे.

जे कोणी स्थानिक भूमिपुत्र व्यवसाय, नोकरी, धंदा, शिक्षण, वैदयकीय कारणांसाठी विविध ठिकाणी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत, त्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकारने विशेष बसेसेची व्यवस्था करावी” अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. यासाठी राज्य सरकारने युध्द पातळीवर एक विशेष अभियान राबवावे अशीही मागणी दरेकर यांनी केली आहे.