Top
Home > Max Political > राज्यातच नेत्यांची तिकिटं कापली गेली : पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट

राज्यातच नेत्यांची तिकिटं कापली गेली : पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट

राज्यातच नेत्यांची तिकिटं कापली गेली : पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट
X

पंकजा मुंडे नाराज आहे. अशा बातम्या सध्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. आज त्या या संदर्भात बीड जिल्ह्यातील गोपिनाथ गड या ठिकाणाहून आपल्या नाराजीचं कारण सांगणार आहेत. 12 डिसेंबर ला दिवंगत भाजपचे नेते गोपिनाथ मुंडे(Pankaja munde) यांची जयंती आहे. या निमित्ताने त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान या पार्श्वभूमिवर पंकजा मुंडे यांनी पीटीआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राज्यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे या भाजप नेत्यांची तिकिट कापण्यात आली. या संदर्भात पंकजा मुंडे यांना प्रश्न केला असता ही तिकिट कापण्याचा निर्णय निर्णय दिल्लीतून नाही तर राज्यातून घेण्यात आला होता, असा गौप्यस्फोट केला आहे.

Updated : 12 Dec 2019 3:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top