Home > News Update > पुणे महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ, शिवसेनेची आघाडीला साथ

पुणे महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ, शिवसेनेची आघाडीला साथ

पुणे महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ, शिवसेनेची आघाडीला साथ
X

पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपचे मुरलीधर मोहोळ (Mulidhar Mohol) यांची निव़ड झाली आहे. मोहोळ यांच्या विरोधातील कॉंग्रेस (Congress) राष्ट्रवादीच्या प्रकाश कदम यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

या निवडणुकीचे वैशिष्टय म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजप(BJP) - शिवसेना (Shivsena) युती तुटल्याचे पडसाद या महानगरपालिकेत पाहायला मिळाले. शिवसेनेने आपली मत आघाडीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं.

2017 साली झालेल्या निवडणुकीनुसार भाजपला निर्विवाद बहुमतानुसार 97 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, मनसे 2 आणि इतर 5 अशी नगरसेवक संख्या महापालिकेत असल्यानं मोहोळ यांची निवड निश्चित मानली जात होती.

हे ही वाचा...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?

“जेएनयू” च्या निमित्ताने….

बेरोजगारीचा बळी : कुटूंबियांचं सांत्वन करायला प्रशासन व लोकप्रतिनिधींना वेळच नाही

आजच्या निवडणुकीत मुरलीधर मोहळ यांना 97 मतं तर प्रकाश कदम 59 मते मिळाली. कौस्तुभ दिवेगावकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम बघितले.

पुणे महापालिकेत 'महाविकास' आघाडी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत 'महाविकास' आघाडी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान केले आहे.

मुरलीधर मोहोळ यांचा अल्पपरिचय

-45 वर्षांचे मुरलीधर मोहोळ हे भाजपतर्फे तीन वेळा नगरसेवक

- शिक्षण :कला शाखेत पदवी

-पुणे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम

-पीएमपीएमएलचे संचालक म्हणूनही केले काम

- भाजपमध्ये युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून सांभाळली जबाबदारी

कोथरूडच्या कामाचे बक्षीस

मोहोळ यांनी कोथरूडमधून आमदारकी लढवण्यासाठी चांगलीच तयारी केली होती. मात्र, अचानक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी 'सेफ' मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड करण्यात आली. दुसरीकडे उमेदवारी गेल्यावरही त्यांनी लांबचा विचार करत पाटील यांचा प्रचार करण्याचा मार्ग स्वीकारला आणि आज त्यांना त्याचेच फळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

Updated : 22 Nov 2019 7:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top