Home > News Update > जादुची कांडी फिरली! ‘हा’ उमेदवार जाणार विधानपरिषदेवर

जादुची कांडी फिरली! ‘हा’ उमेदवार जाणार विधानपरिषदेवर

जादुची कांडी फिरली! ‘हा’ उमेदवार जाणार विधानपरिषदेवर
X

भाजपने राज्यात 21 नोव्हेबरला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची घोषणा केली होती. यामध्ये भाजपने धक्का तंत्राचा वापर करत खडसे, तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे यासारख्या दिग्गज आणि निष्ठावंतांचा पत्ता कट करत वंचित बहुजन आघाडीमधून आलेल्या गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीतून आलेल्या रणजित सिंह मोहिते पाटील यांना संधी दिली. तसंच राज्याला फारसे परिचित नसलेले प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिल्याचं जाहीर केलं होतं.

मात्र, भाजपने आज अचानक चौथा उमेदवार बदलला आहे. भाजपकडून आता अजित गोपचडे यांच्याजागी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान रमेश कराड यांनी कालचं विधानपरिषद निवडणुकीसाठी डमी उमेदवार म्हणून भाजपकडून अर्ज दाखल केला होता. या संदर्भात त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकांउटवर माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मा. प्रवीणजी दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपाचे युवा नेते मा. अरविंद पाटील निलंगेकर आणि प्रदीप पाटील खंडापूरकर हे उपस्थित होते...!

दरम्यान भाजपने अजित गोपचडे यांना हटवून रमेश कराड यांची उमेदवारी कायम केली आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळं पंकजा मुंडे यांनी स्वत:ला तिकिट मिळालं नसलं तरी आपल्या समर्थकांना तिकिट मिळून दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:...

भाजपचे मार्च महिन्यातच उमेदवार फायनल झाले होते, खडसेंचा गौप्यस्फोट

https://www.maxmaharashtra.com/max-videos/eknath-khadse-reveals-ruling-party-offer-for-vidhan-parishad-election/84933/

Updated : 12 May 2020 11:59 AM GMT
Next Story
Share it
Top