Top
Home > Max Political > भाजप आणि एमआयएम एकच – ममता बॅनर्जी

भाजप आणि एमआयएम एकच – ममता बॅनर्जी

भाजप आणि एमआयएम एकच – ममता बॅनर्जी
X

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या वक्तव्यावरुन कायम चर्चेत असतात. ममता बॅनर्जी यांनी एमआयएमवर घणाघाती हल्ला केलाय, भाजप आणि एमआयएम एकच आहे, भाजपाकडून एमआयएम पक्षाला पैसा पुरवला जातो. असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. बंगालमधल्या कूचबिहार इथे तृणमूल कॉंग्रेसच्या जाहीर सभेत ममता बॅनर्जी यांनी एमआयएमवर सडकून टीका केली.

ममता बँनर्जी यांना येणाऱ्या २०२१ च्या निवडणूकांची चिंता आहे. बंगालमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या सभा होत आहेत, त्यामुळे अल्पसंख्यांक गट फुटल्याने बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची चांगलीच फजिती होऊ शकते, म्हणूच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी एमआयएम पक्षाला लक्ष केलं आहे. अल्पसंख्यांक समाजाने असदुद्दीन ओवेसींसारख्यांवर विश्वास ठेवायला नको, एमआयएम ही भाजपची टिम आहे त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असं म्हणत अल्पसंख्यांक समाजाला आपल्यासोबत राहण्याचा सल्ला ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

Updated : 19 Nov 2019 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top