Home > News Update > ....आणि अमिताभ बच्चन यांचे बहुप्रतिक्षित ट्विट आले...

....आणि अमिताभ बच्चन यांचे बहुप्रतिक्षित ट्विट आले...

....आणि अमिताभ बच्चन यांचे बहुप्रतिक्षित ट्विट आले...
X

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या फॅन्ससाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

तसंच त्यांनी देवाचे आभार मानत, आई-वडीलांचे आशिर्वाद, मित्र परिवार आणि फॅन्सच्या शुभेच्छांमुळे आपण कोरोनामुक्त झालो आहोत, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. अमिताभ यांना घरातच पुढचे काही दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. अमिताभ बच्चन यांनी नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानत उत्तम काळजी घेतल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह

कमोडिटी मार्केटमध्ये सोने खरेदी विश्वासार्ह आहे का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शंकरराव खरात यांची पहिली भेट…

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 11 जुलै रोजी नानावटी हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आले होत. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आऱाध्या यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याने नानावटी हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आले होते. पण त्या दोघींना आधीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चन मात्र अजूनही हॉस्पिटलमध्ये एडमिट आहे.

Updated : 2 Aug 2020 4:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top