Home > News Update > Pragya Singh Thakur: परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही- वादग्रस्त वक्तव्य

Pragya Singh Thakur: परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही- वादग्रस्त वक्तव्य

Pragya Singh Thakur: परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही- वादग्रस्त वक्तव्य
X

भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन नेहमी चर्चेत असतात. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या बाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

सध्या भारत आणि चीन दरम्यान सीमेवर तणाव आहे. राहुल गांधी यांनी सीमेवर असलेल्या तणावावरुन केंद्र सरकारला सतत धारेवर धरलं आहे. या संदर्भात राहुल गांधी यांच्यावर टीका करताना परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही असं म्हटलं आहे. चाणक्य यांनी फक्त भुमिपूत्रच आपल्या मातृभूमीचं रक्षण करु शकतो. त्यांनी हे वक्तव्य भोपाळमध्ये केलं आहे.

“काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचं नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करु शकत नाही,”

लोकसभा निवडणुकी दरम्यान ठाकूर यांनी 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्या बाबतही वादग्रस्त वक्तव्य़ केलं होतं. काय म्हटल्या होत्य़ा?

प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप प्रज्ञा सिंह यांनी केला. हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले. त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान प्रज्ञा सिंह यांनी केले होते.

Updated : 29 Jun 2020 7:03 AM GMT
Next Story
Share it
Top