पुण्यात भीम आर्मीचं अर्धनग्न आंदोलन

14

पुण्यात भीम आर्मीनं(Bhima Army) बहुजन एकता मिशनच्या वतीने दिल्लीमध्ये जामीया मिलीया विद्यापीठात पोलिसांनी ज्याप्रकारे विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘NRC’ आणि ‘CAB’ च्या विरोधात भीम आर्मीनं अर्धनग्न आंदोलन केलं.

“जामीया मिलीयामध्ये विध्यार्थ्यांवर असा हल्ला करणे ही निव्वळ हुकूमशाही आहे”. त्यामुळे भीम आर्मीनं अर्धनग्न आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यात. डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन येथे कपडे (शर्ट) काढून आंदोलन करुन दिल्लीतील विद्यार्थ्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतोय असं मत दत्ता पोळ यांनी व्यक्त केलं.

Comments