Home > News Update > #missionbeginagain : मुंबईची दुसरी लाईफलाईन आजपासून

#missionbeginagain : मुंबईची दुसरी लाईफलाईन आजपासून

#missionbeginagain : मुंबईची दुसरी लाईफलाईन आजपासून
X

लॉकडाऊनमुळे (lockdown) गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून बंद असलेली बेस्ट सेवा आजपासून मुंबईकरांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहे. लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्यक सेवांमधील लोकांच्या सोयीसाठी बस सुरू होत्या. पण आता सगळ्यांना बेस्टने प्रवास करता येणार आहे.

पुन्हा सुरूवात करण्याच्या तिसऱ्या टप्प्यात खासगी कार्यालय सुरू होत असल्याने अनेकांची सोय होणार आहे. पण बेस्टने प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्याची परवानगी असणार आहे. तर ५ प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार आहे. ६५ वर्षांवरील व्यक्ती आणि शाळकरी मुलांना बसमध्ये प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा...


राऊतांचा 'रोखठोक' घाव, सोनू सूदची मातोश्रीवर धाव !

कोरोना रुग्णांचे हाल, खासगी हॉस्पिटल्स मालामाल

#missionbeginagain :10 टक्के उपस्थितीसह आजपासून खासगी कार्यालये सुरू

मुंबईच्या हद्दीबाहेरुनही बससेवा

विरार, पनवेल, बदलापूर इथूनही लोकांच्या सोयीसाठी जलद बसेस चालवण्यात येणार आहेत. एकूण ८१ रुटवर २१०० बसेस पहिल्याच दिवशी धावणार आहेत. पण लोकल बंद आहेत आणि बेस्ट आपल्या सर्व बसेस सोडणार नसल्याने किती लोकांना बसमध्ये चढण्याची संधी मिळते ते पाहण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे

Updated : 8 Jun 2020 12:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top