Home > News Update > बीड तिहेरी हत्याकांड: पतीनेच केली पत्नी व पोटच्या दोन मुलांची क्रूर हत्या

बीड तिहेरी हत्याकांड: पतीनेच केली पत्नी व पोटच्या दोन मुलांची क्रूर हत्या

बीड तिहेरी हत्याकांड: पतीनेच केली पत्नी व पोटच्या दोन मुलांची क्रूर हत्या
X

बीड मध्ये आईसह तिच्या दोन मुलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी चा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

बीड शहरातील शुक्रवार पेठ भागात भर दुपारी संगीता कोकणे या महिलेची आणि तिच्या दोन मुलांची निघृण हत्य़ा करण्यात आली होती. आई आणि एका मुलाला दगडांनी ठेचून मारण्यात आलं होतं तर दुसऱ्या मुलाला पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये बुडवून मारण्यात आलं होतं.

यामागे पोलिसांना महिलेचा पती संतोष कोकणे याच्यावर संशय होता. संगीता कोकणे, संदेश कोकणे या दोन्ही माय लेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.

बीड पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना माहिती मिळताच ते घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ तपास सुरु केला. गेल्या अनेक दिवसांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून पतीने तिचा खून केल्याचा अंदाज पोलिसांना होता. अखेर पोलिसांनी दट्या दिल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केल्याचं पोलिस निरिक्षक विश्वास पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

Updated : 24 May 2020 2:55 PM GMT
Next Story
Share it
Top