Home > News Update > झुंज यशस्वी! अशोक चव्हाण कोरोना मुक्त

झुंज यशस्वी! अशोक चव्हाण कोरोना मुक्त

झुंज यशस्वी! अशोक चव्हाण कोरोना मुक्त
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळातील दोन मंत्र्यांनी कोरोना वर मात केली आहे. गेल्या काही आठवड्य़ांपुर्वीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना वर मात केली होती. तर आता बांधकाम कॉंग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील कोरोना वर मात केल्याचं वृत्त आहे.

अशोक चव्हाण यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे 25 मे ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशोक चव्हाण यांना कोरोना झाल्याची माहिती कळताच त्यांना नांदेड येथून मुंबईत हलवण्यात आले होते. गेल्या 10 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असलं तरी त्यांना 14 दिवस रुग्णालयात राहावं लागणार आहे.

अशोक चव्हाण यांच्यावर 10 दिवस उपचार सुरु होते. अखेर 10 दिवसानंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर अशोक चव्हाण यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. आता अशोक चव्हाण हे मुंबईतील घरी 14 दिवस क्वारंटाईन राहतील

Updated : 4 Jun 2020 10:59 AM GMT
Next Story
Share it
Top