Home > News Update > 'विप्रो'चे संस्थापक दानशूर अझीम प्रेमजी आज रोजी होणार निवृत्त

'विप्रो'चे संस्थापक दानशूर अझीम प्रेमजी आज रोजी होणार निवृत्त

विप्रोचे संस्थापक दानशूर अझीम प्रेमजी आज रोजी होणार निवृत्त
X

‘विप्रो’चे संस्थापक अझीम प्रेमजी आज निवृत्त होत आहेत. कंपनीने साधारण महिन्यापुर्वीच ही अधिकृत घोषणा केली होती. मात्र, निवृत्तीनंतर ते नॉन-एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीनंतर ‘विप्रो’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी अझीम यांचा मुलगा रिशद प्रेमजी यांच्या हाती देण्यात आली आहे. अजीम प्रेमजी यांनी ५३ वर्ष ही जबाबदारी सांभाळली.

रिशद प्रेमजी हे आत्तापर्यंत कंपनीच्या रणनीती विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आले आहेत. तर ‘विप्रो’मध्ये अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अब्दाली नीमुचवाला यांची जबाबदारी वाढवण्यात आली असून अब्दाली नीमुचवाला हे विप्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत. हे बदल उद्यापासून अर्थात 31 जुलैपासून आमलात आणले जातील.

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान असणाऱे अजीम प्रेमजी धनाबरोबरच मनाने देखील श्रीमंत आहेत. त्यांनी मार्च महिन्यात आपल्या हिश्श्याची सर्वच्या सर्व कमाई समाजसेवेसाठी दान केली होती. त्यामुळे ते जगभरात चर्चेत आले होते. त्यांनी तब्बल ५२ हजार ७५० कोटी रुपये अझीम प्रेमजी फाऊंडेशनकडे हस्तांतरीत केले होते.

फोर्ब्सच्या यादीत ३८ व्या स्थानावर असणाऱे अझीम प्रेमजी २०१८ च्या आर्थिक वर्षात देशात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते.

Updated : 30 July 2019 4:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top