Home > News Update > राम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात, संभाजी भिडे यांची मागणी

राम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात, संभाजी भिडे यांची मागणी

राम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात, संभाजी भिडे यांची मागणी
X

राम मंदीर भूमिपुजनाचा सोहळा येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या संदर्भात शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी 'राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त देशभर आनंदोत्सव म्हणून साजरा व्हावा. प्रत्येक घरात रामाच्या प्रतिमेचे पूजन व्हावे. अयोध्येतील मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना करताना सर्व पुरुष देवतांना पुरुषत्वाचे प्रतीक असलेल्या मिशा असाव्यात याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी,'

तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण नसेल तरीही त्यांनी अयोध्येला जावे. असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे.

राम मंदिराचे पतन झाल्यानंतर सुमारे ५०० वर्षांनी आयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न होत आहे. गाव, खेड्यात हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा. या सोहळ्यात आयोध्येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आगत्याने पूजन करावे, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केली.

Updated : 3 Aug 2020 9:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top