Home > News Update > ‘कोरोना’च्या धसक्यानं अशोक चव्हाण यांचा ‘ई-लोकदरबार’!

‘कोरोना’च्या धसक्यानं अशोक चव्हाण यांचा ‘ई-लोकदरबार’!

‘कोरोना’च्या धसक्यानं अशोक चव्हाण यांचा ‘ई-लोकदरबार’!
X

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे निर्देश दिल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या बुधवारी नियोजित लोकदरबार कार्यक्रमाऐवजी ई-लोकदरबार घेण्याचे जाहीर केले आहे.

ई-लोकदरबारमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना bit.ly/E-LokDarbar या लिंकवर उपलब्ध असलेल्या गुगल फॉर्ममध्ये आपले निवेदन किंवा समस्या पाठवता येईल. ही लिंक बुधवार, दि. १८ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अॅक्टिव्ह असणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर ही लिंक ओपन करून आपली अडचण लेखी स्वरूपात नमूद करावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे. ई-लोकदरबारच्या गुगल फॉर्मची ही लिंक अशोक चव्हाण यांच्या फेसबुक, ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर देखील पोस्ट केलेली आहे.

लोकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दर बुधवारी कुलाबा, मुंबईस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या गांधीभवन कार्यालयात लोकदरबार सुरू केला होता. मध्यंतरी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात विधीमंडळातील व्यस्ततेमुळे लोकदरबार तात्पुरता स्थगित होता. अधिवेशन संपल्यानंतर लोकदरबार पुन्हा सुरू करताना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाची समस्या समोर आल्याने परिस्थिती निवळेपर्यंत प्रत्यक्ष भेटीच्या लोकदरबारऐवजी त्याचा डीजिटल पर्याय म्हणून ई-लोकदरबार घेण्याचे चव्हाण यांनी जाहीर केले आहे.

ई-लोकदरबारमुळे नागरिकांना प्रवास करून गांधीभवनला येण्याची आणि गर्दीत मिसळण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र या माध्यमातून त्यांची निवेदने स्वीकारण्यासाठी एक पर्यायी व्यवस्था उपलब्ध असेल, असे अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले.

Updated : 17 March 2020 12:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top