Home > News Update > महाशिवआघाडीचा विलंब भाजपच्या पथ्यावर?

महाशिवआघाडीचा विलंब भाजपच्या पथ्यावर?

महाशिवआघाडीचा विलंब भाजपच्या पथ्यावर?
X

शिवसेना,(shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि काँग्रेस (Congress) या तीनही पक्षांकडून सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. एकत्र येऊन सत्ता स्थापन करायची असल्यास किमान समान तयार करण्यासाठी या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. अखेर काल किमान समान कार्यक्रमावर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सह्या केल्या. मात्र, यामध्ये शिवसेनेने प्रचारामध्ये जाहीर केलेला १० रूपयाच्या थाळीचा मुद्दा कार्यक्रमाच्या सर्वांत शेवटच्या क्रमांकावर आहे.

या तीन पक्षांच्या प्रतिनिधींनी किमान समान कार्यक्रम तयार केला असला तरी आघाडीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. हा कार्यक्रम काँग्रेस हायकामांडकडे पाठवला जाणार आहे. याशिवाय शरद पवार (Shard pawar) आणि सोनिया गांधी (Sonia gandi) यांचीही दिल्लीत भेट होणार आहे.

अशा गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीत शरद पवार नागपूरच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर निघून गेले आहेत. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला 'सिल्व्हर ओक'मुले विलंब होतोय अशी शंका उपस्थित होत आहे. ही सगळी परिस्थिती पाहता या पक्षांच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील मिळण्यास आणि आघाडीची किंवा सरकारस्थापनेची अधिकृत घोषणा होण्यास आणखी बराच कालावधी असल्याचं दिसतंय.

तिकडे भाजपही (BJP)काही शांत बसलेली नाही. 'आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही' असं भाजपचे नेते सांगत असले तरी असं असणं शक्य नाही. नारायण राणे (narayn rane) यांनी माध्यमांसमोर येऊन सरकारस्थापनेची जबाबदारी स्वीकारली असल्याचं सांगितलं. त्यामुळे भाजप बॅकफूटवर गेलेली असली तरी त्यांनी प्रयत्न करणं निश्चित थांबवलेलं नाही.

आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नव्या महाशिवआघाडीला अधिकृतपणे अस्तित्वात येण्यास जितका उशीर होईल तितकं भारतीय जनता पक्षाचा सरकार बनवण्याचा आत्मविश्वास वाढत जाणार आहे.

Updated : 15 Nov 2019 9:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top