शिवसेना सक्रीय, बीड मध्ये होमिओपॅथीक औषधाचं वाटप

Courtesy: Social Media

कोरोनाच्या रुग्णांसाठी ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधाचा वापर केल्यास फायदा होत असल्याचे आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलं आहे. आज शिवराज्याभिषेक दिन त्यानिमित्ताने कोरोनासारख्या वैश्विक महामारीपासून बचाव करण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील 5 लाख नागरिकांना ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधाचं वाटप करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान 5 लाख नागरिकांना या औषधांचा लाभ होणार असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. काकु-नाना प्रतिष्ठाण व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून हे औषध तयार करण्यात आले आहे. याचे वाटप शिवराज्यभिषेक दिनाच्या औचित्याने, आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं.