शिवसेनेसोबत जाणार का? पाहा काय म्हणाले शरद पवार..
X
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कधी सत्ता स्थापन होणार याकडे राजकीय वर्तुळाबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांचं देखील लक्ष लागलं आहे. त्यातच आज राज्यातील दिग्गज नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीवारीवर आहेत.
आज मुख्यमंत्र्यांनी दिल्ली येथे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली, तर शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.
सोनिया गांधी यांच्या भेटी नंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेसोबत जाणार का? असा प्रश्न विचारला असता पवार यांनी...
"शिवसेनेसोबत चर्चा नाकारता येत नाही. शिवसेनेकडून अद्याप विचारणा झालेली नाही. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारणा व्हायला हवी. आम्हाला कोणाकडूनही प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,"
असं म्हणत शरद पवार यांनी शिवसेनेकडून प्रस्ताव न आल्यानं आपण शिवसेनेसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले.
काय म्हणाले शरद पवार...
मी जे बघतोय त्यानुसार मला असं दिसतंय की शिवसेनेला त्यांच्या नेतृत्वात सरकार हवे आहे..
कुणी आम्हाला विचारलं तरी पाहिजे.
शिवसेना आणि भाजपमध्ये जे सुरू आहे ते 'केवल बार्गेनिंग गेम नाही, मुझे सिरीयस लगता है'