Top
Home > News Update > मुंबई: Covid 19 च्या रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर आता सनदी अधिकाऱ्यांचा वॉच, ई-मेलद्वारे द्वारे नोंदवा तक्रार

मुंबई: Covid 19 च्या रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर आता सनदी अधिकाऱ्यांचा वॉच, 'ई-मेल'द्वारे द्वारे नोंदवा तक्रार

मुंबई: Covid 19 च्या रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर आता सनदी अधिकाऱ्यांचा वॉच, ई-मेलद्वारे द्वारे नोंदवा तक्रार
X

मुंबई मध्ये देशातील सर्वाधिक कोरोना चे रुग्ण आहेत. त्यातच अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचार मिळत नसल्याचं वारंवार सांगितलं आहे. खाजगी दवाखान्यातील ८० टक्के राखीव करुनही उपचार मिळत नसल्यानं अखेर बृहन्मुंबई महापालिकेने आज मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कार्य क्षेत्रातील 'कोविड कोरोना १९' ची बाधा झालेल्या रुग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, याकरिता राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा या महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत.

या खाटांचे रुग्णांना वितरण करण्याचे समन्वयन देखील महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे. तसेच या ८० टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी सदर रुग्णालयाद्वारे केली जात आहे.

खाजगी रूग्णालयामधील खाटांचे वितरण सामान्यातील सामान्य व्यक्तीला अधिक प्रभावीपणे होण्यासह या वैद्यकीय सेवा सुविधा रुग्णांना अधिक परिणामकारकपणे मिळाव्यात; याकरिता सुयोग्य समन्वय साधण्यासाठी ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाद्वारे नुकतीच केली आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांकडे गेल्याच महिन्यात मुंबईतील महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांच्या समन्वयाचे दायित्व देखील सोपविण्यात आले होते.

वरील तपशिलानुसार मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातील सेवा सुविधांच्या अधिक प्रभावी समन्वयासाठी सनदी अधिकारी मदन नागरगोजे, सनदी अधिकारी अजित पाटील, सनदी अधिकारी राधाकृष्णन, प्रशांत नारनवरे आणि सुशील खोडवेकर यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा सुयोग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती ही प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे.

तसेच एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयात करिता ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे थेटपणे आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

वरील तपशिलानुसार ५ सनदी अधिकाऱ्यांची नावे, त्यांच्याकडे दायित्व देण्यात आलेल्या खासगी रुग्णालयाचे नाव आणि काही तक्रार किंवा सूचना असल्यास; ती पाठविण्यासाठी संबंधित सनदी अधिकाऱ्यांचा 'ईमेल आयडी' पुढीलप्रमाणे आहे :

१. मदन नागरगोजे यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, काॅनवेस्ट व मंजुळा एस बदानी जैन इस्पितळ आणि एस.आर.सी.सी. हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास नागरगोजे यांचा ईमेल पत्ता पुढीलप्रमाणे आहे:

[email protected]

२. अजित पाटील यांच्याकडे मसिना रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, के जे सोमय्या रुग्णालय, गुरू नानक इस्पितळ आणि पी डी हिंदुजा हॉस्पिटल यांचे दायित्व सोपविण्यात आले आहे. पाटील यांचा ईमेल पत्ता :

[email protected]

३. राधाकृष्णन यांच्याकडे एस एल रहेजा रुग्णालय, लीलावती इस्पितळ, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल (रिलायन्स), बी.एस.इ.एस. रुग्णालय, सुश्रुषा रुग्णालय आणि होली स्पिरिट हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ई-मेल :-

[email protected]

४. सुशील खोडवेकर यांच्याकडे कोहिनूर रूग्णालय, हिन्दू सभा रुग्णालय, एस आर व्ही चेंबूर रुग्णालय, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एल एच हिरानंदानी इस्पितळ, सुराणा सेठिया रुग्णालय आणि फोर्टीस रुग्णालय या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ई-मेल : [email protected]

५. . प्रशांत नारनवरे यांच्याकडे करूणा रूग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नाणावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय आणि अपेक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांविषयी काही तक्रार किंवा सुचना करावयाची असल्यास त्यासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे आहे :-

[email protected]

Updated : 6 Jun 2020 6:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top