संतापजनक! नगरमध्ये बलात्कार पीडित महिलेला नग्न करून मारहाण

3315

बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या मारहाणीत पोलिसही सहभागी असल्याचा पीडित पतीपत्नीचा आरोप आहे.

या घटनेनंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसात तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू आणि नवऱ्याचे वीर्य काढून बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे.