Home > News Update > "राज ठाकरे चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?"

"राज ठाकरे चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?"

राज ठाकरे चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?
X

मनसेअध्यक्ष राज ठाकरे चौकशीसाठी आज 'ईडी'च्या कार्यालयात दाखल झाले. मात्र यावरून आता राजकीय वातावरण तापायला लागलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावरून राज ठाकरेंवर टीका केलीय. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार 'ईडी'च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? हे सर्व नाटक असून राज यांचे सर्व कुटुंब मिळून ईडीला माहिती देणार आहे का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय.

चौकशीसाठी कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाणं हे राज यांचं नाटक असून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचंही दमानिया यांनी म्हटलंय.

Updated : 22 Aug 2019 6:17 AM GMT
Next Story
Share it
Top