Home > News Update > पालघर जिल्ह्यात २०० किलोमीटरपेक्षा मोठी दगडी भिंत !

पालघर जिल्ह्यात २०० किलोमीटरपेक्षा मोठी दगडी भिंत !

पालघर जिल्ह्यात २०० किलोमीटरपेक्षा मोठी दगडी भिंत !
X

चीनमधली जगातली सगळ्यात मोठी भिंत हा तसा प्रत्येकाच्याच उत्सुकतेचा विषय आहे, अशीच उत्सुकता निर्माण केलीये पालघरमधल्या एका दगडी भिंतीनं...पालघर जिल्ह्यातील काही तरुणांनी एक दगडी भिंत शोधून काढलीये.

जिल्ह्यांतील अनेक नद्या, नाले , डोंगर यांना छेद देत गेलेल्या या दगडांची एक रांग सध्या चर्चेचा विषय ठरलीये. पुढे ही भिंत एका बाजूने ठाणे जिल्हा तर दुसऱ्या बाजूने गुजरातकडे गेलेली दिसते. काही गावांमध्येही ही भिंत दिसते. पण या अद्भुत भिंतीकडे अजूनही पुरातत्व खात्याचं लक्ष गेलेलं नाही. ही भिंत निसर्गनिर्मित आहे की मानव निर्मित याचा शोध घेणे गरजेचे आहे, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आपटी, विक्रमगड तालुक्यातील सातखोर, कवडास, उपराळे, तलवाडा, डोल्हारी, खडकी,भोपोली,धारमपूर,कुर्झे(तलवाडा) या गावांना तर वाडा तालुक्यातील मुंगूस्ते, आपटी, साई देवळी, घोडमाळ, असनस, गुंज, नांदणी, नंतर पुढे वज्रेश्वरीकडे ही भिंत गेली असल्याचे दिसतं.

या शिला पूर्व-पश्चिम या अवस्थेत तुकड्यांमध्ये रचलेल्या दिसुन येतात. या भिंतीला तिथले स्थानिक गावकरी भुईबांध, किंवा भिमबांध या नावाने ओळखतात. या भिंतीबाबत विविध दंतकथाही आहेत. ही भिंत पांडवकालीन असल्याचीही आख्यायिका आहे.

रायगड जिल्ह्यापासून ठाणे पालघर आणि अगदी गुजरातपर्यंत विस्तारलेल्या बांधाची लांबी दोनशे किलोमीटर पेक्षाही जास्त असल्याची माहिती अभ्यासकांनी दिलीये. अनेक मोठे दगडे एकावर एक रचलेले यात दिसतात.

या दगडांपासून बनलेली 40 ते 50 फूट उंचीची ही ही भिंत नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय बनला आहे . मात्र या बांधाचा उल्लेख इतिहास काळात तसेच कोणत्याही पुस्तकात नसल्याने पुरातत्त्व विभागाकडून याचा अभ्यास करण्यात यावा अशी मागणीदेखील अभ्यासकांकडून करण्यात येते.

Updated : 2 Jan 2020 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top