Home > News Update > राहुल गांधी यांच्या प्रश्नावर अमित शहा यांचं उत्तर म्हणाले...

राहुल गांधी यांच्या प्रश्नावर अमित शहा यांचं उत्तर म्हणाले...

राहुल गांधी यांच्या प्रश्नावर अमित शहा यांचं उत्तर म्हणाले...
X

लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये कोणतीही घुसखोरी झालेली नाही असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केला. पण यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

चीनच्या आक्रमकतेपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा भूभाग सोडून दिला असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

“चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती”, “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”,

याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी द्यावे, असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या या प्रश्नानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah) यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे.

या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी यात राजकारण करू नका, असं केलं होतं. हा व्हिडीओ ट्विट करत अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा

चीनी मालावर बहिष्कार टाकून नुकसान कुणाचे ? चीनचे की भारताचे?

चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधान मोदींची शरणागती – राहुल गांधी

#कोरोनाशी_लढा- शिवभोजन थाळीनं भागवली लाखो लोकांची भूक

काय म्हटलंय या ट्विटमध्ये?

“एका शूर जवानांच्या पित्यानं स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. आज संपूर्ण देश एकवटला आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं आणि राष्ट्राच्या हितासाठी एकजुटीनं उभं राहायला हवं,”

Updated : 20 Jun 2020 9:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top