Home > News Update > केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह
X

देशात दररोज कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून डॉक्टरांनी आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली.

“कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर मी कोरोनाची चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. पण माझी प्रकृती व्यवस्थित असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये एडमिट होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी विलगीकरणात जावे आणि स्वत:ची चाचणी करुन घ्यावी” असे आवाहन अमित शाह यांनी ट्विट करुन केले आहे.

दरम्यान अमित शाह यांना लवकर बरे वाटावे अशा शुभेच्छा राहुल गांधी ट्विट करुन दिल्या आहेत.

Updated : 2 Aug 2020 3:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top