Home > News Update > मला कसलाही आजार नाही, मी ठणठणीत!: अमित शहा

मला कसलाही आजार नाही, मी ठणठणीत!: अमित शहा

मला कसलाही आजार नाही, मी ठणठणीत!: अमित शहा
X

गेल्या २-३ दिवसांपासून सोशल मीडियावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. आता स्वतः अमित शाह यांनी ट्विट करत आपण ठणठणीत असल्याचं म्हटलंय.

फेसबुक, ट्विटरवर अमित शाह यांना हाडाचा कॅन्सर झाला असल्याच्या अनेक पोस्ट्स व्हायरल आहेत. यासोबत एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एका व्हिडीओ कॉन्फरन्समधला एक फोटोही व्हायरल केला जातोय. या फोटोत अमित शाह यांची प्रकृती ढासळली असल्याचं सांगण्यात येत होतं.

या सर्वांचं अमित शाह यांनी खंडण केलंय. 'काही लोकांनी माझ्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या आहेत. अनेकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना पण केल्या. मी देशाचा गृहमंत्री या नात्याने कोरोनाच्या या काळात कामात व्यस्त आहे, म्हणून या अफवांकडे मी दुर्लक्ष केलं.

पण पक्षाच्या लाखो कार्यकर्त्या आणि शुभचिंतकांनीही माझ्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. त्यांना मला सांगायचं आहे की, मी पूर्णपणे सदृढ आहे, मला कसलाही आजार झालेला नाही.' असं अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

मेरे स्वास्थ्य की चिंता करने वाले सभी लोगों को मेरा संदेश। pic.twitter.com/F72Xtoqmg9

— Amit Shah (@AmitShah) May 9, 2020

"गेल्या काही दिवसात माझ्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट अफवा पसरल्या आहेत. इतकंच काय तर काही लोकांनी ट्वीट करून माझ्या मृत्यूची प्रार्थना केली. देश सध्या कोरोना विषाणूविरुद्धची लढाई लढत आहे. देशाचा गृहमंत्री या नात्याने दिवसरात्र काम सुरू आहे. त्यामुळे या अफवांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.

"अनेकजण काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेऊन व्यक्त होत आहेत. माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, हितचिंतकांनी गेल्या दोन दिवसात माझी विचारपूस केली. त्यांची काळजी मी समजू शकतो. माझी प्रकृती उत्तम असून, मला कोणताही आजार नाही.

"हिंदू मान्यतांनुसार, अशा पद्धतीच्या अफवांमुळे प्रकृतीला आणखी बळ मिळतं. अफवांसारख्या व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा, मलाही माझं काम करू द्या.

"अफवा पसरवणाऱ्यांप्रति माझ्या मनात कोणताही द्वेषभाव नाही. तुमचेही धन्यवाद."

Updated : 9 May 2020 1:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top