कोरोनाबाबत पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं

All about corona virus

कोरोना व्हायरस म्हणजे विषाणूंमधील अशी एक मोठी जात ज्यामुळे मानव किंवा प्राणी आजारी पडतात. मानवाला या विषाणूचा संसर्ग झाल्यास सर्दीपासून ते श्वसन यंत्रणेत संसर्ग होण्याचा धोका असतो. कोरोना व्हायरसमुळे COVID -19 हा आजार होतो हे नुकतंच सिद्ध झाले आहे.

COVID-19 हा एक संसर्गजन्य आजार आहे जो नुकत्याच शोध लागलेल्या कोरोना व्हायरसमुळे होतो. चीनमधील वुहानमध्ये गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पहिल्यांदा या विषाणूचा आणि आजाराचा प्रादुर्भाव झाला. तोपर्यंत जगाला या विषाणूची आणि आजाराची माहिती नव्हती.

COVID-19 आजाराची सर्वसामान्य लक्षणं म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांमध्ये अंगदुखी, वेदना, नाक बंद होणे, नाक वाहणे, घसा कोरडा पडणे किंवा डायरिया होणे अशीही लक्षणे दिसतात. सुरुवातीला अत्यंत कमी आणि सौम्य प्रमाणात ही लक्षणे जाणवतात. काही लोकांना संसर्ग झाला तरी त्यांच्यात अशी लक्षणं दिसत नाहीत किंवा त्यांना अस्वस्थही वाटत नाही. या विषाणूची लागण झालेले ८० टक्के लोक कोणत्याही विशेष उपचाराशिवाय बरे होतात. या विषाणूचा संसर्ग झालेल्या दर ६ पैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर होते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. वृद्ध लोक आणि ज्यांना उच्च रक्तदाब, ह्रदयविकार किंवा मधुमेहाचा त्रास आहे त्यांना या संसर्गामुळे गंभीर त्रास होऊ शकतो. ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

ज्याला या विषाणूचा संसर्ग झाला आहे त्याच्यापासून इतरांना COVID-19 होऊ शकतो. COVID-19ची लागण झालेली व्यक्ती जेव्हा खोकते किंवा शिंकते तेव्हा त्या व्यक्तीच्या नाक किंवा तोंडातून उडालेल्या थेंबांमुळे इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. हे थेंब आजूबाजूच्या वस्तू किंवा पृष्ठभागांवर पडतात. त्यानंतर इतर व्यक्तींचा या वस्तू किंवा पृष्ठभागाला स्पर्श झाला आणि त्यांनी आपल्या त्याच हातांनी तोंड, डोळे किंवा नाकाला स्पर्श केला तर COVID-19ची लागण होते. याशिवाय जेव्हा COVID-19ची लागण झालेली व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा ते थेंब श्वसनामार्गे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात गेले तर त्या व्यक्तीलाही COVID-19ची लागण होऊ शकते. त्यामुळे अशा आजारी व्यक्तीपासून १ मीटर(3 फूट) लांब राहावे.

जागतिक आरोग्य संघटना(WHO) या आजाराचा प्रसार कसा होतो यावर अजून संशोधन करत आहे आणि तुम्हाला वेळोवेळी याची अद्ययावत माहिती दिली जाईल.

 • सर्वांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जागतिक आरोग्य संघटनेची वेबसाईट, राष्ट्रीय आणि स्थानिक आरोग्य यंत्रणा यांच्यामार्फत COVID-19 बाबत दिल्या जाणाऱ्या अद्ययावत माहितीबाबत जागरुक राहा. जगभरातील अनेक देशांमध्ये COVID-19चे रुग्ण आहेत. चीनसह इतर काही देशांना या आजाराचा प्रसार कमी करण्यात किंवा रोखण्यात यश आले आहे. पण परिस्थिती सातत्याने बदलत असल्याने सतत बातम्यांच्या माध्यमातून अपडेट राहा. काही साध्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही COVID-19ची लागण किंवा प्रसाराचा धोका कमी करु शकता.

 • तुम्ही तुमचे हात नियमितपणे अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर किंवा साबण आणि पाण्याने स्वच्छ करा. यामुळे तुमच्या हातावर असलेले व्हायरस नष्ट होऊ शकतात.

 • खोकला किंवा शिंक येणाऱ्या व्यक्तीपासून किमान १ मीटर(३ फूट) अंतर ठेवा.

 • डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा

 • तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे लोक श्वसनाचे आरोग्य सांभाळण्याची खबरदारी घ्या, म्हणजे खोकताना किंवा शिंकताना तुमच्या हाताच्या कोपराचा भाग, टिश्यू पेपर तोंडासमोर किंवा नाकासमोर धरा. त्यानंतर वापरलेला टिश्यू पेपर कचरापेटीत टाकून द्या. यामुळे तुम्ही तुमचे आणि तुमच्या आसपासच्या लोकांचे सर्दी, खोकला आणि COVID-19 संरक्षण करु शकता.

 • तुम्हाला बरे वाटत नसेल तर घरीच थांबा. तुम्हाला जर ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या. तुमच्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा.

 • COVID-19च्या मुख्य केंद्रांबाबत (ज्या शहरांमध्ये किंवा स्थानिक भागांमध्ये COVID-19चा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे) माहिती घेत राहा. जर तुम्ही वयस्कर आहात किंवा तुम्हाला मधुमेह, ह्रदयविकार किंवा फुफ्फुसाचा आजार असेल तर अशा ठिकाणांना भेट देणे टाळा, कारण तुम्हाला या आजाराचा संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे. COVID-19चा प्रसार झालेल्या ठिकाणी असलेल्या किंवा (गेल्या 14 दिवसात)त्या ठिकाणाला भेट दिलेल्या व्यक्तींसाठी खबरदारीच्या सूचना

 • वर दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा (सर्वांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना)

 • जर तुम्हाला बरे वाटत नसेल किंवा डोकेदुखी, ताप, नाक वाहणे अशी सौम्य लक्षणे जाणवली तर बरे वाटेपर्यंत घरीत स्वयं विलगीकरणात राहा. जर तुम्हाला आवश्यक वस्तुंसाठी बाहेर जावे लागणार असेल तर तोंडावर मास्क बांधा, त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका टळतो.

 • जर तुम्हाला ताप, खोकला आणि श्वसनासा त्रास होत असेल तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या, कारण तुम्हाला हा त्रास श्वसन यंत्रणेतील संसर्ग किंवा इतर गंभीर परिस्थितीमुळे होऊ शकतो. तसेच तुम्ही नुकताच कुठे प्रवास केला असेल किंवा कुठल्या प्रवाशांच्या संपर्कात आला असाल तरी त्याची माहिती आधीच देऊन ठेवा.
 • तुम्ही कुठे आहात यावर ही शक्यता अवलंबून आहे आणि विशेषत: त्या ठिकाणी COVID-19चा फैलाव झाला आहे का यावरही ते अवलंबून आहे.

 • बहुतांश लोकांना बहुतांश ठिकाणी COVID-19ची लागण होण्याचा धोका सध्या तरी कमी आहे. पण जगात आता अशी काही ठिकाणं आहेत (शहरं किंवा परिसर) जिथे आता COVID-19चा संसर्ग वाढू लागला आहे. या भागात राहणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या लोकांना COVID-19 ता धोका जास्त असतो.

 • COVID-19चा नवीन रुग्ण आढळला तर सरकारी आणि आरोग्य अधिकारी तातडीनं कारवाई करत आहेत. प्रवास, सामूहिक कार्यक्रम यावरील निर्बंध पाळा. COVID-19चा संसर्ग टाळण्यासाठीच्या प्रयत्नांना सहकार्य केल्यास तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

 • COVID-19 चा प्रसार रोखता येतो आणि त्याचा संसर्ग थांबवता येऊ शकतो हे चीन आणि इतर देशांमध्ये आढळून आले आहे. पण दुर्दैवाने नव्यानेही याचा संसर्ग वेगाने पसरु शकतो. तुम्हाला जिथे जायचे आहे तिथल्या परिस्थितीची माहिती तुम्हाला असणे खूप महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून COVID-19च्या जागतिक परिस्थितीची अद्ययावत माहिती रोज प्रसिद्ध केली जाते.

लहान मुलं आणि तरुणांमध्ये COVID-19च्या संसर्गामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण सौम्य असते. पण COVID-19 ची लागण झालेल्या प्रत्येकी 5 पैकी एका रुग्णाला गंभीर आजार होऊ शकतो. त्या रुग्णावर हॉस्पिटलमध्ये उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळेच लोकांना COVID-19ची लागण आपल्याला किंवा आपल्या नातेवाईकांना होऊ शकते अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे.

आपण जर आपल्या काळजीचं रुपांतर कृतीत केले तर आपण स्वत: आपले नातेवाईक आणि समाजाला सुरक्षित ठेवू शकतो. यातील सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजे हात नियमितपणे आणि पूर्णपणे स्वच्छ धुणे आणि श्वसन व्यवस्थेचे आरोग्य सांभाळणे. दुसरे म्हणजे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रवास आणि सामूहिक कार्यक्रमांवर घातलेल्या निर्बंधांची माहिती घेऊन त्याचे पालन करा.

COVID-19 वर आमचे अजूनही संशोधन सुरू आहे, पण वृद्ध माणसे आणि आधीपासून आजार (उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, फुफ्फूसांचे आजार, कॅन्सर आणि मधुमेह) असलेल्या लोकांना COVID-19ची लागण होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.

नाही. अँटिबायोटिक या विषाणूंवर उपायकारक नाहीत. ते बॅक्टेरियाचा संसर्ग बरा करु शकतात. COVID-19 हा व्हायरसमुळे होतो म्हणून अँटिबायोटिक उपयोगाचे नाही. त्यामुळे अँटिबायोटिकचा वापर COVID-19 टाळण्यासाठी किंवा बरा करण्यासाठी करु नये. अँटिबायोटिकचा वापर बॅक्टेरियामुळे झालेल्या संसर्गावर उपचार कऱण्यासाठी डॉक्टरांच्या सल्लानुसारच करावा.

काही पाश्चिमात्य, पारंपरिक किंवा घरगुती उपायांमुळे आराम पडतो आणि COVID-19ची लक्षणे कमी होतात. पण सध्याच्या कोणत्याही औषधामुळे हा आजार रोखता किंवा बरा करता येतो याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. COVID-19 रोखण्यासाठी किंवा बरा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं कोणत्याही स्वऔषधी किंवा कोणत्याही औषधाची किंवा अँन्टिबायोटिकची शिफारस केलेली नाही. पण तरीही सध्या काही पाश्चिमात्य आणि पारंपरिक औषधांचा समावेश असलेल्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. यातील वैद्यकीय संशोधनाबाबत जागतिक आरोग्य संघटना तुम्हाला वेळोवेळी माहिती देत राहील.

अजून तरी नाही. आजच्या तारखेला तरी COVID-19 वर उपचार करण्यासाठी कुठलीहा लस किंवा विशिष्ट संसर्गरोधक औषध नाही. पण ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांची लक्षणं बरी होतील याची काळजी घेतली गेली पाहिजे. गंभीर आजार असलेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले पाहिजे. योग्य काळजी घेतली गेल्याने अनेक रुग्ण बरे झाले आहेत.

 • यावरील संभाव्य लस आणि विशिष्ट औषधावर सध्या संशोधन सुरू आहे. त्यांच्या सध्या विविध वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. COVID-19 रोखण्यासाठी आणि बरा करण्यासाठी लस आणि औषध निर्मितीच्या प्रयत्नांमध्ये जागतिक आरोग्य संघटना समन्वयाचे काम करत आहे.

 • यCOVID-19चा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही आणि इतरांनीही हात वारंवार स्वच्छ धुणे हा सुरक्षेचा उत्तम उपाय आहे. खोकताना किंवा शिंकताना तुमच्या हाताच्या कोपराचा भाग, टिश्यू पेपर तोंडासमोर किंवा नाकासमोर धरा आणि खोकला किंवा शिंक येणाऱ्या व्यक्तींपासून किमान १ मीटर(३ फूट) अंतर ठेवा.

नाही. ज्या विषाणूमुळे COVID-19 चा संसर्ग होतो आणि 2003मध्ये ज्या विषाणूमुळे सार्स (Severe Acute Respiratory Syndrome)चा संसर्ग झाला होता तो विषाणू हे अनुवांशिकदृषट्या एकमेकांशी संबंधित आहेत, पण त्यांच्यामुळे होणारे आजार वेगवेगळे आहेत.

सार्स हा अतिधोकादायक पण COVID-19 पेक्षा कमी संसर्गजन्य होता. 2003 नंतर जगभरात सार्सचा कुठेही फैलाव झालेला नाही.

जर तुमच्य़ात COVID-19ची लक्षणं असतील (विशेषत: खोकला) किंवा तुम्ही जर COVID-19च्या रुग्णाची सेवा करत असाल तरच मास्कचा वापर करा. विल्हेवाट लावता येण्यासारखा मास्क एकदाच वापरावा. जर तुम्ही आजारी नसाल किंवा एखाद्या आजारी माणसाची सेवा करत नसाल तर मास्कचा वापर करुन तो वाया घालवू नका. जगभरात मास्कचा तुटवडा आहे त्यामुळे मास्कचा जपून वापर करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केले आहे.

मास्कचा वापर योग्य पद्धतीने करण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटना करत आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात एका मुख्य स्त्रोताचा अनावश्यक वापर टाळला जाईल.

 1. एक लक्षात घ्या मास्क हा फक्त आरोग्य कर्मचारी, रुग्णांची काळजी घेणारे आणि ज्यांना ताप आणि खोकल्यासारखी श्वसन यंत्रणेच्या त्रासाची लक्षणं जाणवत आहेत त्यांनीच वापरावा.

 2. मास्कला स्पर्श करण्याआधी हात अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरने किंवा साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.

 3. मास्क फाटलेला किंवा त्याला छिद्रे नाहीत ना ते तपासून घ्या.

 4. मास्कची योग्य बाजू बाहेरच्या दिशेने आहे याची खात्री करुन घ्या (रंगीत बाजू)

 5. मास्क तुमच्या चेहऱ्यावर लावा. मास्कचा कडक किंवा धातूचा भाग नाकावर येईल अशा पद्धतीने मास्क लावा.

 6. मास्कचा खालचा भाग खाली खेचा त्यामुळे तुमचे तोंड आणि हनुवटी झाकली जाईल.

 7. वापर झाल्यानंतर मास्क काढा, कानाला लावलेली इलेस्टिकची दोरी काढून मास्क चेहरा आणि कपड्यांपासून दूर करा, त्यामुळे मास्कच्या दूषित झालेल्या पृष्ठभागाला स्पर्श होणार नाही.

 8. वापर झाल्यानंतर मास्क झाकणबंद कचरापेटीत टाकून द्या.

 9. मास्कला स्पर्श केल्यानंतर आणि त्याची विल्हेवाट लावल्यानंतर हात स्वच्छ करा. अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर किंवा साबण आणि पाण्याने हात स्वच्छ करा.

Incubation Period म्हणजे विषाणूची लागण झाल्यापासून COVID-19 आजाराची लक्षणं दिसण्याचा काळ. हा कालावधी साधारणत: १ ते १४ दिवसांचा असतो. सर्वसामान्यपणे ५ दिवसांच्या आसपासचा काळ. जेवढी जास्त माहिती उपलब्ध होईल तसा हा डाटा आणखी अद्ययावत केला जाईल.

कोरोना विषाणू ही विषाणूंमधील एक मोठी जात आहे. हे विषाणू सामान्यपणे प्राण्यांमध्ये आढळून येतात. कधी कधी मानवाला या विषाणूचा संसर्ग होऊन त्यातून तो इतरांनाही होऊ शकतो. उदा. SARS – COV हा मांजरासारख्या दिसणाऱ्या प्राण्याशी संबंधित होता आणि MERS COV ची लागण उंटाच्या एका जातीपासून होते. पण COVID-19चा संसर्ग प्राण्यापासून झाला असल्याचे अजून तरी सिद्ध झालेले नाही.

जेव्हा तुम्ही जिवंत प्राण्यांच्या बाजारात जाता तेव्हा स्वसंरक्षणासाठी प्राण्यांशी थेट संपर्क टाळा, तसेच ज्या पृष्ठभागांचा प्राण्यांशी संपर्क येतो त्याला स्पर्श करु नका. कच्च मांस, दूध किंवा प्राण्यांचे अवयव काळजीपूर्वक हाताळा. न शिजवलेले अन्न आणि कच्चे किंवा कमी शिजवलेले प्राणीजन्य पदार्थ टाळा.

 1. आतापर्यंत फक्त हाँगकाँगमध्ये एका कुत्र्याला संसर्ग झाल्याचे एकमेव उदाहरण आहे, पण कुत्रा, मांजर किंवा पाळीव प्राण्यामुळे COVID-19चा संसर्ग झाल्याचा एकही पुरावा नाहीये.

 2. COVID-19चा प्रसार प्रामुख्याने बाधीत व्यक्तीच्या खोकण्यातून, शिंकण्याने किंवा बोलत असताना उडालेल्या थेंबांमुळे होतो. हा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही हात ठराविक वेळाने आणि पूर्णपणे स्वस्छ करा.

 3. जागतिक आरोग्य संघटना ताज्या संशोधनावर आणि COVID-19शी संबंधित विषयांवर लक्ष ठेवून आहे आणि यातून निघालेल्या निष्कर्षांची माहिती देत राहील.
 1. COVID-19ला कारणीभूत ठरणारा विषाणू पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहू शकतो हे निश्चित नाही. पण याबाबत त्याची हालचाल ही इतर कोरोना विषाणूंप्रमाणे असते. एका अभ्यासानुसार कोरोना विषाणू(COVID-19 विषाणूच्या प्राथमिक माहितीच्या समावेशासह) एखाद्या पृष्ठभागावर काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत जगू शकतो. पण ही स्थिती वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळी असू शकते. (उदा. पृष्ठभागाचा प्रकार, तापमान किंवा वातावरणातील आर्द्रता)

 2. जर तुम्हाला एखादा पृष्ठभाग संसर्ग झाल्यासारखा वाटत असेल तर तो साधे जंतूनाशक वापरुन स्वच्छ करुन घ्या. तुमचे हात अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझरने किंवा साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. तुमच्या डोळ्यांना, तोंडाला किंवा नाकाला स्पर्श करु नका.

हो. एखाद्या बाधीत व्यक्तीमुळे व्यापारी माल दुषित होण्याची शक्यता फारच कमी असते. विविध वातावरण आणि तापमानांच्या भागातून प्रवास करुन आणलेल्या पार्सलमुळे COVID-19ला कारणीभूत ठरेल अशा विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यताही खूपच कमी आहे.

सध्या SARS-COV-2 आणि COVID-19ला कारणीभूत ठरणारा कोरोना व्हायरस यांचे उगमस्थान अज्ञात आहे. SARS-COV-2चे उगमस्थान हे जिवंत प्राणी असून कुठलाही निर्माण केला गेलेला विषाणू नाही, हे उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरुन सूचित होते. SARS-COV-2चा संबंध हा पर्यावरणीयदृष्ट्या वटवाघुळांशी असण्याची दाट शक्यता आहे. SARS-COV-2 हा अनुवांशिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या विषाणूंच्या समूहाशी संबंधित आहे. यात वटवाघळांपासून वेगळ्या झालेल्या SARS-CoV आणि इतर अनेक CoVचा समावेश आहे. MERS-COVचा सुद्धा याच समुहत समावेश होतो पण त्यांचा जवळचा संबंध नाही.

 1. COVID-19 चा पहिला मानवी संसर्ग चीनमधील वुहान शहरात डिसेंबर 2019मध्ये पाहायला मिळाला. पण सुरूवातीला चीनमध्ये SARS-CoV-2 चा संसर्ग किती व्यक्तींना झाला होता ते ठरवणे अशक्य आहे.

 2. असे असले तरी 2003मध्ये फैलावलेल्या SARSला कारणीभूत ठरलेला SARS-CoV-2 हा विषाणू प्राण्यांमधून (मांजरीसारखा जंगली प्राणी) मानवामध्ये शिरला आणि त्यानंतर त्याचा मानवजातीत फैलाव झाला. अगदी याचप्रकारे SARS-CoV-2चा प्राण्यांपासून मानवाला संसर्ग झाल्याचं मानलं जात आहे. पण हा संसर्ग प्राण्यांमधून मानव हाताळत असलेल्या प्राण्यांना झाला आणि त्यातून पुढे त्याचा संसर्ग मानवाला झाल्याचंही मानलं जात आहे. पण हा संसर्ग पाळीव प्राणी, भटके प्राणी किंवा भटके प्राणी जे पाळले गेले, यापैकी नेमका कुणामुळे झाला हे शोधता आलेले नाही.

 3. या विषाणूचं उगमस्थान शोधल्याशिवाय त्याच्यावर नियंत्रण मिळवता येत नाही आणि त्यामुळे या विषाणूचा मानवाला पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे. तसंच सध्या आपण जे अनुभवतोय तशी परिस्थिती पुन्हा पुन्हा येण्याचा धोकाही कायम आहे.

COVID-19 ला कारणीभूत ठरणारा विषाणूचा संसर्ग हा प्रामुख्याने बाधीत व्यक्तीच्या खोकला, शिंकणे किंवा बोलण्यातून उडणाऱ्या थेंबांमुळे होतो. हे थेंब जड असल्याने हवेत तरंगू शकत नाहीत. त्यामुळे ते जमिनीवर किंवा पृष्ठभागांवर पडतात.

COVID-19ची लागण झालेल्या व्यक्तीपासून तुम्ही १ मीटर म्हणजेच ३ फूट अंतराच्या आत असाल तर तुम्हाला श्वासाद्वारेही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो किंवा दुषित झालेल्या पृष्ठभागाला तुम्ही स्पर्श केला आणि तेच हात न धुता जर तुम्ही डोळ्याला, तोंडाला किंवा नाकाला लावले तर या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.