Home > News Update > तेव्हाही बोललो आणि आजही बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराज की जय!

तेव्हाही बोललो आणि आजही बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराज की जय!

शिवजयंतीला व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतोय, मात्र तुम्ही नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत आहात. तुमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला होता, याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे असा प्रतिप्रश्न नवाब मलिक यांनी केला आहे.

तेव्हाही बोललो आणि आजही बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराज की जय!
X

शिवजयंतीला व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतोय, मात्र तुम्ही नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत आहात. तुमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला होता, याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे असा प्रतिप्रश्न नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देत असताना नवाब मलिक शांत ऊभे आहेत अशा आशयाचा व्हिडीओ दोन-तीन दिवसांपासून व्हायरल आहे. त्यावरून भाजप समर्थकांनी नवाब मलिक यांना चांगलंच ट्रोल केलंय.

हे ही वाचा..

दोन वर्षांपूर्वी शिवस्वराज्य यात्रेतील रायगडावर पक्षाचे सर्व नेते फोटो काढण्यासाठी जमले होते. धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा केली. त्यावेळी सर्वजण जय म्हणाले. मी सुद्धा जय म्हणालो, फक्त हात वरती केला नाही, याचा भाजपवाले वेगळा प्रचार करत आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

त्यावेळीही मी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली आणि आजही देत आहे. शासनाच्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय असं बोलूनच सुरुवात केली होती याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली.

हे ही वाचा..

Updated : 22 Feb 2020 10:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top