Home > News Update > शरद पवारांची मनधरणी अयशस्वी, उदयनराजेंचा उद्या भाजपप्रवेश?

शरद पवारांची मनधरणी अयशस्वी, उदयनराजेंचा उद्या भाजपप्रवेश?

शरद पवारांची मनधरणी अयशस्वी, उदयनराजेंचा उद्या भाजपप्रवेश?
X

होय नाही करत उदयनराजेंच्याही भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचं कळतंय. उद्या म्हणजेच १४ सप्टेंबरला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे.

खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काल स्वतः शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात पुण्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यामुळे उदयनराजे राष्ट्रवादी सोडणार नाहीत असं बोललं जात होतं. मात्र, पक्ष सोडण्याआधी पवारांचा शेवटची भेट घेण्यासाठी उदयनराजे आले होते असं आता समजतंय.

उदयनराजेंनी पक्ष सोडू नये यासाठी खा. अमोल कोल्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला आहे. भाजपप्रवेशानंतर १५ तारखेला साताऱ्यात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेतही उदयनराजे सहभागी होणार आहेत.

Updated : 13 Sep 2019 3:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top