Home > News Update > #कोरोनाशी लढा : आजपासून 'Mission Begin Again'

#कोरोनाशी लढा : आजपासून 'Mission Begin Again'

#कोरोनाशी लढा : आजपासून Mission Begin Again
X

गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून लॉकडाऊनमुळे (lockdown) ठप्प झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थचक्राला पुन्हा वेग देण्यासाठी आजपासून राज्यात पुन्हा सुरूवात होते आह़े. निर्बंधासह रिक्षा, ऑटो, स्कूटर या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, दुकानेसुद्धा निर्धारित केलेल्या नियमानुसार व वेळेत सुरु राहतील.

#MissionBeginAgain कसे असेल?

टप्पा 1 (3 जून 2020 पासून)

बाह्य हालचाली – सायकलिंग / जॉगिंग / धावणे / चालणे यासारख्या वैयक्तिक शारीरिक व्यायामासाठी किनारपट्टी, सार्वजनिक / खाजगी क्रीडांगणे, सोसायट्या/ संस्थांची क्रीडागंणे, उद्याने आणि टेकड्यांवर काही अटी व शर्तींवर सर्वसामान्य नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बंद भागामध्ये (इनडोअर) अथवा इनडोअर स्टेडियम मध्ये कोणत्याही कामांना परवानगी देण्यात आलेली नाही.

कोणत्याही सामूहिक कामास (ग्रुप अटिव्हिटी) अथवा क्रियेस परवानगी दिली जाणार नाही. तथापि, मुलांबरोबर प्रौढ व्यक्ती देखील असाव्यात.

लोकांनी मर्यादित कालावधीत शारिरीक व्यायामासाठी घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

इतर कोणत्याही कामाना अथवा उपक्रमांना परवानगी नाही.

लोकांना फक्त जवळपास / शेजारच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची परवानगी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासास परवानगी दिली जाणार नाही.

लोकांना गर्दी असलेल्या मोकळ्या जागांना टाळावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

सायकलिंग सारख्या शारीरिक व्यायामावर जास्त भर द्यावा, जेणेकरून सामाजिक अंतर ठेवण्यास आपोआप मदत होईल.

प्लंबर, इलेक्ट्रिशियन, किटक नियंत्रक (पेस्ट कंट्रोल) व तंत्रज्ञ यासारख्या स्वयंरोजगार करणाऱ्यांनी योग्य सामाजिक अंतर पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कामे करावीत.

पूर्व परवानगी/ वेळ ठरवून घेऊन वाहनांची दुरुस्ती व वर्कशॉप सुरू करता येतील.

सर्व शासकीय कार्यालये (आणीबाणी, आरोग्य व वैद्यकीय, तिजोरी, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, नगरपालिका सेवा वगळता जे शेवटच्या पातळीपर्यंत गरजेनुसार कामे करू शकतात) हे 15 टक्के कर्मचारी अथवा कमीत कमी 15 कर्मचारी यापैकी जी जास्त संख्या असेल त्या संख्येच्या मनुष्यबळांसह सुरू करण्यात येतील.

हे ही वाचा...


अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपाल आमने सामने

महाराष्ट्र कोरोनावरील लस विकसित करणार, 30 माकडांवर प्रयोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन, 'हे' आहे कारण...

'निसर्ग' संकट : वादळाचा वेग वाढला, सतर्क राहा!

#MissionBeginAgain – फेज २ (५ जून २०२० पासून)

सर्व मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सशिवाय) ही पी – १, पी – २ बेसिसवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. (रस्ता, गल्ली किंवा एखाद्या क्षेत्रातील एका बाजूची दुकाने ही विषम तारखेला तर दुसऱ्या बाजूची दुकाने ही सम तारखेला खुली राहतील).

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने कपड्यांच्या किंवा तत्सम दुकानांमध्ये ट्रायल रुमचा वापर करता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील याची दुकानदारांनी खबरदारी घ्यायची आहे. ग्राहकांना उभे राहण्यासाठी जमिनीवर चिन्ह तयार करणे, टोकन पद्धती, होम डिलीव्हरी आदींना प्रोत्साहन द्यावे.

खरेदीसाठी लोकांनी पायी जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्यतो जवळची दुकाने, मार्केटमध्ये खरेदी करावी. बिगर अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लांबच्या प्रवासाला अनुमती नाही. खरेदीसाठी वाहनांचा वापर करण्यात येऊ नये.

सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत दुकान, मार्केट हे प्रशासनाकडून बंद करण्यात येईल.

टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी, रिक्षासाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी, चारचाकी वाहनासाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी तर मोटारसायकलसाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ प्रवासी याप्रमाणे अनुमती असेल.

#MissionBeginAgain – टप्पा 3 (8 जून पासून सुरु होईल)

सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के मनुष्यबळासह सुरु करता येतील. इतर कर्मचारी घरी राहून काम करतील. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर यांचे नियम पाळावे लागतील. घरी परतल्यानंतर घरातील वयस्कर व्यक्तींना कोणताही संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. या अनुषंगाने संबंधित आस्थापनांनी योग्य त्या सूचना/निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना द्यावे लागतील.

जी कामे करण्यासाठी बंदी नाही ती सुरु ठेवता येतील. परवानगी असलेल्या कामांसाठी कोणत्याही शासकीय परवानगीची गरज असणार नाही. स्टेडियम आणि खुली क्रीडा संकुले ही व्यक्तिगत कवायती, व्यायामासाठी वापरात येतील. मात्र या ठिकाणी प्रेक्षक वा दर्शकांच्या सहभागावर पूर्णपणे बंदी राहील. इनडोअर स्टेडियममध्ये कोणत्याही बाबीस परवानगी दिली जाणार नाही. सर्व शारीरिक कवायती आणि व्यायाम सामाजिक अंतराचे नियम पाळून करणे आवश्यक राहील.

सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे राहील- दुचाकी एक प्रवासी, तीन चाकी किंवा ऑटो रिक्शा – 1 अधिक 2 प्रवासी, चार चाकी वाहन – 1 अधिक 2 प्रवासी.

जिल्ह्यांतर्गत बस वाहतुकीला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह अनुमती असेल. तसेच यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे तसेच स्वच्छताविषयक काळजी घ्यावी लागेल.

आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) बस वाहतुकीला अनुमती नसेल. यासंदर्भातील आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील.

सर्व दुकाने, मार्केटस् हे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहतील. गर्दी दिसल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाकडून सदरची दुकाने किंवा मार्केट तातडीने बंद करण्यात येतील.

पुढील बाबींना राज्यभर प्रतिबंध :

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था,विविध शिकवणी वर्ग बंद.

प्रवाशांच्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी. (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून)

मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद.

स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी न घेतल्यास रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी.

सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह, आणि तत्सम इतर ठिकाणे बंद.

सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या समारंभांना बंदी.

सार्वजनिक धार्मिक स्थाने / पुजास्थळे बंद.

केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर बंद.

शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद.

Updated : 3 Jun 2020 1:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top