Home > News Update > पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात अभाविपच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप

पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात अभाविपच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप

पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात अभाविपच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप
X

पुण्य़ातील फर्ग्युसन महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पुरोगामी संघटनांशी निगडीत विद्यार्थ्यास केलेल्या मारहाणीमुळे तणावपुर्ण वातावरण निर्माण झालं आहे. महाविद्यालय प्रशासन याची दखल घेत नसल्यामुळे पुरोगामी संघचनेच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या इमारतीसमोर ठिय्या मांडला.

हे ही वाचा...

दोन दिवसांपुर्वी ही मारहाण केली असल्याचा आरोप पुरोगामी संघटनेचे विद्यार्थी करत आहेत. त्यासंदर्भातील तक्रार महाविद्यालय प्रशासनाने पोलीसांकडे द्यावी आणि मारहाण झालेल्या परिसरातील CCTV फुटेज द्यावं अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. महाविद्यालय प्रशासन ABVP च्या विद्यार्थ्यांना झुकतं माप देत असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांनी केला. संबधित प्रकरणात विद्यार्थ्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र महाविद्यालय प्रशासनाने यासाठी परवानगी नाकारली.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/175858317004020/?t=1

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी सदर आरोप फेटाळले असून ABVP ला बदनाम करण्याचा कट असल्याचा प्रतिआरोप केला आहे. या मारहाण प्रकरणी दोन्ही बाजूने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या गेल्यात. ठिय्या आंदोलन सुरू झाल्यावर महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र परदेशी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी पोलिसांना मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटवावं लागलं.

Updated : 31 Jan 2020 5:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top