Home > News Update > पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७ हजार ११०

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७ हजार ११०

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७ हजार ११०
X

पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 04 हजार 887 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 658 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

यापैकी पुणे जिल्हयातील 11 हजार 397 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 110 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 811 आहे. कोरोनाबाधित एकूण 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 263 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.38 टक्के आहे.

पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये २४ तासाात ५७३ ने वाढ झाली आहे.

हे ही वाचा..

राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० हजारांपर्यंत

मृत्यू विषयी चिंतनातून करोना विषाणू सोबत जगण्याची उमेद – अ‍ॅड. असीम सरोदे

कोकण दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या या १९ मागण्या

यामध्ये पुणे जिल्ह्यात 424, सातारा जिल्ह्यात 14, सोलापूर जिल्ह्यात 108, सांगली जिल्ह्यात 21 तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयातील 718 कोरोना बाधीत रुग्ण असून 472 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 215 आहे. कोरोनाबाधित एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 1 हजार 612 कोरोना बाधीत रुग्ण असून 814 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 661 आहे. कोरोना बाधित एकूण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 213 कोरोना बाधीत रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 101 आहे. कोरोना बाधित एकूण 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 710 कोरोना बाधीत रुग्ण असून 603 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 99 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Updated : 14 Jun 2020 2:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top