मुंबई: धोका वाढला, कोरोना रुग्णांची संख्या ३ हजारांच्यावर

कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात आता कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४ हजार ६६६वर पोहोचली आहे. तर सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने ३ हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे ३ हजार ३२ रुग्ण असून १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३४२ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने सोडून देण्यात आले आहे. तर राज्यातील कोरोनाबळींची संख्या २३२वर पोहोचली आहे. पण महाराष्ट्रभऱातही ५७२ जणांना बरे वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईनंतर पुण्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्ण असून ही संख्या आता ६६३वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १०१ जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ठाणे असून इथं कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४०३ झाली असून ११ रुग्णांचा मृत्यूब झाला असून २७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांमधील स्थिती

१. पालघर – १२४
२. नाशिक – ९५
३. नागपूर – ७०
४. रायगड – ४८
५. औरंगाबाद – ३०
६. अहमदनगर – २९
७. सांगली – २७
८. सोलापूर – २१
९. बुलडाणा – २१
१०. अकोला – १६
११. यवतमाळ – १५
१२. सातारा -१३
१३. कोल्हापूर – ८
१४. लातूर – ८
१५. रत्नागिरी- ७
१६. अमरावती – ६
१७. जळगवा –
१८. उस्मानाबाद – ३
१९. चंद्रपूर – २
२०. धुळे – १
२१. नंदुरबार – ४
२२. सिंधुदुर्ग – १
२३. जालना -१
२४. परभणी – १
२५. बीड – १
२६. वाशिम- १
२७. गोंदिया – १