Home > News Update > महाराष्ट्रातून आतापर्यंत किती परप्रांतीय मजूर परतले?

महाराष्ट्रातून आतापर्यंत किती परप्रांतीय मजूर परतले?

महाराष्ट्रातून आतापर्यंत किती परप्रांतीय मजूर परतले?
X

कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर त्यांच्या त्यांच्या राज्यात परतले आहेत. महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. १ मे ते १ जून या महिनाभरात जवळपास ११ लाख ८६ हजार २१२ परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले. यासाठी ८२२ विशेष श्रमिक ट्रेन महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

हे ही वाचा...


सरकार मध्ये समन्वय नव्हता: विजय वड्डेटीवार

डोनाल्ड ट्रम्प यांना का व्हावे लागले अंडरग्राउंड?

राज्याला चक्रीवादळाचा इशारा, एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, या 14 पिकाचं समर्थन मूल्य वाढवलं...

श्रमिक ट्रेनचे सर्व पैसे भरल्याचा सरकारचा दावा खोटा- देवेंद्र फडणवीस

#कोणकोणत्या राज्यात गेल्या विशेष श्रमिक ट्रेन ?

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये - ४५०

बिहारमध्ये -१७७

मध्यप्रदेशमध्ये -३४

झारखंडमध्ये - ३२

कर्नाटक- ६

ओरिसामध्ये -१७

राजस्थान -२०

पश्चिम बंगाल - ४७

छत्तीसगडमध्ये - ६

यासह इतर राज्यांमध्ये एकूण ८२२ ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशनमधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) मधून १३६, लोकमान्य टिळक टर्मिनल १५४, पनवेल ४५, भिवंडी ११, बोरीवली ७१, कल्याण १४, ठाणे ३७, बांद्रा टर्मिनल ६४, पुणे ७८, कोल्हापूर २५, सातारा १४, औरंगाबाद १२, नागपुर १४ यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.

Updated : 2 Jun 2020 1:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top