Home > News Update > ट्विटरवर लोक म्हणत आहेत, 'आओ मोदी चौराहे पर'

ट्विटरवर लोक म्हणत आहेत, 'आओ मोदी चौराहे पर'

ट्विटरवर लोक म्हणत आहेत, आओ मोदी चौराहे पर
X

देशात नोटाबंदीचा निर्णय लागू करून आज ३ वर्ष पूर्ण होत आहेत. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः सोशल मीडियावर नेटिझन्स यावर भरभरून लिहीत आहेत. ट्विटरवर आज #आओमोदीचौराहे_पर हा हॅशटॅग ट्रेन्ड करत आहे. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चालनातून बाद केल्या. या निर्णयावर मोठी टीका झाली होती.

"मी देशाकडे केवळ ५० दिवस मागितले आहेत. जर माझा हा निर्णय चुकला, यात दुसरा कोणता उद्देश दिसला तर कोणत्याही चौकात उभं राहून देश जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे" असं मोदी एका भाषणात म्हणाले होते.

हाच धागा पकडून ट्विटरवर #आओमोदीचौराहे_पर हा हॅशटॅग वापरून नेटिझन्स ट्विट करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहेत.

Updated : 8 Nov 2019 3:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top