Home > News Update > CAA आणि NRC च्या विरोधात रबीहाचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत सुवर्ण पदक घेण्यास नकार

CAA आणि NRC च्या विरोधात रबीहाचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत सुवर्ण पदक घेण्यास नकार

CAA आणि NRC च्या विरोधात रबीहाचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत सुवर्ण पदक घेण्यास नकार
X

पॉन्डीचेरी विद्यापीठाची सुवर्णपदक विजेती रबीहा अब्दुर रहिम (Rabiha Abdur raheem) हिने राष्ट्रपतीच्या उपस्थित सुवर्ण पदक घेण्यास नकार दिला आहे. देशात सध्या मोठ्या प्रमाणात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मोठा विरोध केला जात आहे. रबीहा ने देखील या कायद्याला विरोध म्हणून सुवर्ण पदक घेण्यास नकार दिला आहे.

राष्ट्रपती यांच्या उपस्थित पुरस्कार वितरण असतानाही सुवर्ण पदक घेण्यास नकार देणाऱ्या रबीहाला या संदर्भात विचारलं असता, तिला कारण न सांगता तेथून निघण्यास सांगितल गेलं. आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद जेव्हा कार्यक्रम स्थळापासून गेले तेव्हाच तिला आत प्रवेश देण्यात आल्याचं रबीहानं माध्यमांना सांगितलं आहे. जेव्हा रबीहा दिक्षांत समारंभास भाग घेण्यासाठी गेली तेव्हा डोक्याला निळ्या रंगाचा स्कार्फ बांधला होता. मात्र, दिक्षांत समारंभात नेहमी परिधान केला जातो असा पारंपारिक गाऊनही तिने परिधान केला होता. रबीहाने या संपूर्ण घटनेची माहिती आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.

“एक महिला, एक विद्यार्थी आणि एक भारतीय या नात्याने मी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि एनआरसी (NRC) विरोधात लढा देणाऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी माझे सुवर्णपदक घेण्यास नकार देते. मी जगाला हे दाखवण्यासाठी करत आहे की, आम्हा तरुणांसमोर शिक्षणाचा काय अर्थ आहे, हे पदक आणि प्रमाणपत्र नाही तर अन्याय, फॅसिझम आणि कट्टरतेविरूद्ध उभे राहणे आहे.”

रबीहा अब्दुररहीम, गोल्ड मेडलिस्ट, पॉन्डीचेरी विद्यापीठ

विनाकारण अपमान?

रबीहाने या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, जिथे शेकडो लोक पदकं आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित होते, जेव्हा राष्ट्रपती आले तेव्हा तिला (रबीहाला) जाण्यास सांगण्यात आले. जेव्हा राष्ट्रपती निघून गेले तेव्हाच तिला आत येण्यास परवानगी देण्यात आली. याबद्दल तिला कोणतंही कारण दिले गेलं नव्हते.

या सर्व घटेनेबाबत ती आपल्या पोस्टमध्ये समाधान व्यक्त करते. एक सुशिक्षित तरुणी म्हणून एका मुद्द्यावर आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचं आपल्याला समाधान असल्याचं म्हणते. विशेष म्हणजे ती या पोस्टमध्ये एक बाब स्पष्टपणे सांगते की, तिला कोणीही स्कार्फ काढण्याचे सांगितले नाही. मात्र, तिला तिथून जाण्याचे कारण ही सांगण्यात आले नाही. रबीहाने फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ टाकला आहे, ज्यामध्ये ती सुवर्णपदक घेण्यास नकार देताना दिसते. मात्र, तिने प्रमाणपत्र घेतले असल्याचं एका फोटोत दिसून येतं.

दरम्यान या कार्यक्रमा अगोदर राष्ट्रपती कोविंद (President Ramnath Kovind) पॉंडिचेरी विद्यापीठाच्या 27 व्या दीक्षांत समारंभास गेले. तेव्हा तेथील काही विद्यार्थांनी आणि शिक्षकांनी CAA आणि NRC च्या विरोधात या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारशी शरणार्थीना 31 डिसेंबर 2014 पर्यंत नागरिकत्व मिळू शकेल अशी तरतूद आहे. मुस्लिमांचा यात समावेश नाही.

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स एनआरसीची यामध्ये तरतूद आहे की, 24 मार्च 1971 रोजी बांगलादेशहून आसामला येणार्‍या लोकांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल. आणि त्यानंतरच्या लोकांना देशातून हद्दपार केले जाईल. किंवा डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवले जाईल.

पॉंडेचरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी आणि लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी हे देखील कडक सुरक्षा व्यवस्थे दरम्यान झालेल्या या दीक्षांत समारंभास उपस्थित होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शेकडो लोक त्याच्या समर्थनार्थ आले आणि त्यांनी त्याची स्तुती केली. यासोबतच बर्‍याच लोकांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्यांच्याकडे बोटं दाखवली.

Updated : 25 Dec 2019 1:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top