Home > News Update > मन जिंकणारा संशोधक

मन जिंकणारा संशोधक

मन जिंकणारा संशोधक
X

लॉकडाउन आणि टाळेबंदीच्या कालावधीमध्ये जनजीवन स्तब्ध झालं असताना लोक नैराश्याच्या छायेत जगत होते. मात्र, अशा संकटाच्या काळात काही माणसं मानवी जातीला जगण्याची उर्मी देतात. त्यातील एक नाव म्हणजे प्रा. डॉ. राजेंद्र गिरिजाप्पा सोनकवडे... कोव्हिड च्या काळात निराशेच्या गर्तेत जगणाऱ्या लोकांना ‘आँसू बहाने से अच्छा है पसीना बहाना’ असं म्हणत जगण्याची उर्मी देण्याचं काम प्रा. डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी केलं आहे.

कोरोनाच्या काळात ही त्यांचं लोकांसाठी काम सुरुच होतं. सॅनिटायझर टनेल बनवण्याचं काम असो की, अतिनील किरणटॉर्च निर्मिती असो किंवा निर्जंतुकीकरण करणारे रोबोट असो. हे सर्व काम कोरोनाच्या काळात सुरुच होते.

नुकतीच १५ सप्टेंबर २०२० रोजी राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत शैक्षणिक विषयासंबंधीच्या चर्चासत्रासाठी उपस्थित राहण्याचे खास निमंत्रण सोनकवडे सरांना मिळाले. तेव्हा त्या ‘ग्रेट भेटीतून’ राज्यपालांनी देखील सरांच्या कार्याची दखल घेतली. दरम्यानच्या चर्चेमध्ये आवर्जून त्यांनी सरांच्या प्रस्तुत संशोधननिर्मितीबाबत सखोल माहिती घेतली व त्यांच्या चेहऱ्यावर कुतुहुलाचे रूपांतर एक प्रकारच्या आनंद व सरांप्रती अभिमानाच्या भावांमध्ये झाले.

शासनप्राप्त/ संस्थांमार्फत मिळणाऱ्या अनुदान निधीतून शक्य होईल तेवढेच कार्य करणाऱ्या व वीकेंड, बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरांच्या कार्यातून सणसणीत चपराक बसते. कोणत्याही कार्याला हात घातला की येणाऱ्या अडीअडचणींकडे एक संधी म्हणून पाहण्याची सकारात्मक वृत्ती, त्याचबरोबर आपल्या संशोधनाचे उपयोजन सर्वसामान्यांना व्हावे. ही एक त्यामागची तळमळ हा त्यांचा निस्वार्थ मानस असल्यामुळे आपसूकच निसर्गातील सर्व शक्ती त्यांना त्यांच्या कार्यसफलतेसाठी मदत करत असाव्यात.

यातूनच निर्मिती होते. ती भव्य दिव्य कार्याची. तळमळीनं कार्य करणाऱ्या अश्या असाधारण व्यक्तिमत्वाची मराठी वाचकाला ओळख व्हावी यासाठी केलेला हा अल्पप्रयत्न. कुतुहूल, धाडस, रहस्य, जिद्द, विजय या सगळ्यांचे जिवंत उदाहरण म्हणजेच प्रा. डॉ. सोनकवडे. सरांच्या सातत्याने उंचावणाऱ्या कर्तृत्वाची आम्हाला साधीतरी अल्प ओळख व्हावी. यासाठी केलेला हा लेखनप्रपंच...

Updated : 25 Sep 2020 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top