Home > News Update > पत्रकारांना दिलासा! 'त्या' 94 पत्रकारांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

पत्रकारांना दिलासा! 'त्या' 94 पत्रकारांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

पत्रकारांना दिलासा! त्या 94 पत्रकारांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह
X

मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची बाब काही दिवसांपूर्वी सामोर आली होती. त्यानंतर लॉकडाऊन काळात जीव धोक्यात घालून वार्तांकन करण्याऱ्या पत्रकारांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

म्हणून 'ईस्टर्न प्रेस असोसिएशन'तर्फे मुंबईतील पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या संस्थांमधील ९४ पत्रकारांचे स्वॅब घेण्यात आले. या सर्व पत्रकारांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या उपक्रमात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई दक्षिण-मध्यचे खा. राहुल शेवाळे यांचे सहकार्य मिळाले. यासोबत वरिष्ठ पत्रकार सुभाष शिर्के, रवींद्र आंबेकर, विलास आठवले, मनोज भोयर यांच्या सहकार्याबद्दल 'ईपीए'चे अध्यक्ष मनोज चंदेलिया यांनी आभार मानले आहेत.

Updated : 23 April 2020 4:59 AM GMT
Next Story
Share it
Top